Sunny Deol | बॉर्डर 2 कधी येणार? सीक्वलवर प्रश्न विचारताच भडकला सनी देओल
गदरच्या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली. गदरनंतर आता बॉर्डरचा दुसरा भाग कधी येणार? या चर्चांवर अभिनेता सनी देओलने संताप व्यक्त केला आहे.
गदर 2 सिनेमा ब्लॉकबस्टर ठरल्यानंतर सोशलमिडीयावर होणाऱ्या चर्चांबद्दल अभिनेता सनी देओल चांगलाच भडकला. एका मुलाखतीत त्याने या सगळ्या चर्चांवर नाराजी व्यक्त केली आहे. बऱ्याच वर्षांचा ब्रेक घेतल्यानंतर अभिनेता सनी देओलने गदर 2 मधून बॉलिवूडमध्ये दमदार कमबॅक केलं. गदर 2 सिनेमाला प्रेक्षकांनी मोठी पसंती दर्शवली. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली.
अशातच आता सनी त्याच्या गाजलेल्या सिनेमांचा दुसरा भाग घेऊन येणार आहे. अशी चर्चा सोशल मिडीयावर होत आहे. सनी गदर 3 आणि बॉर्डर 2 सिनेमांचे शुटींग करत असून लवकरच हे दोन्ही सिनेमे रीलीज होणार आहे. अशा चर्चांवर सनी देओल ने नाराजी व्यक्त केली. गेले काही दिवस या चर्चांना उधाण येत होतं मात्र आता स्वत: सनीने चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.
सनी म्हणतो की, सोशल मिडीयावर सतत अफवा येत असतात, आणि त्यावर लोक सहजपणे विश्वास ठेवतात. बऱ्याच दिवसांपासून सोशलमिडीयाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जात होती. या सगळ्या अफवांमुळं मला खूप त्रास सहन करावा लागला. असं कोणत्याही सिनेमाच्या सिक्वेलचं शूट सध्या मी करत नाहीये. जेव्हा असं काही करणार असेल तेव्हा मी स्वत:हून याची माहिती देईल. लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असं त्याने सांगीतलं आहे.
सध्या बॉलिवूडचा हा तारा सिंह त्याच्या नव्या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. राजकुमार संतोषी दिग्दर्शित 'लाहोर 1947' या सिनेमात सनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारत पाकिस्तानच्या युद्धावर आधारीत या सिनेमाचा आमिर खान निर्माता आहे. एका मुलाखतीत सनी म्हणाला की, राजकुमार संतोषी बरोबर बऱ्याच वर्षांनी काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद होत आहे. आमीर खान, राजकुमार संतोषी आणि मी तिघही एकत्र येत पहिल्यांदा काम करत आहोत , त्यामुळे मी या सिनेमासाठी खुपच उत्सुक आहे, असं त्याने सांगीतलं आहे.
लेखक आणि दिग्दर्शक राजकुमार संताषी यांनी 1990 मध्ये घायाल या सिनेमातून दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकलं. या मीनाक्षी शेषाद्री आणि अमरीश पुरी हे मुख्य भुमिकेत होते.
या सिनेमाकरीता त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दामिनी, अजब प्रेम की गजब कहानी , द लीजेंड ऑफ भगत सिंह हे काही सिनेमे त्यांचे गाजले आहेत.