56 कोटींच्या कर्जात बुडालेल्या सनी देओलची एकूण संपत्ती किती माहितीये का?
Sunny Deol`s Total Net Worth : सनी देओलवर 56 कोटींचं कर्ज पण त्याची एकूण संपत्ती किती त्याचा आकडा वाचून तुम्हालाही बसेल मोठा धक्का...
Sunny Deol's Total Net Worth : बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा एकीकडे त्याच्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे त्याच्या सनी देओलच्या मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या बंगल्याच्या लिलावाची चर्चा होती. काल सनी देओलच्या लिलावाती जाहिरात समोर आली असता, आज त्याच्या बंगल्याचा लिलाव हा पुढे थांबवण्यात आला आहे. त्यावरून सगळीकडे चांगलीच चर्चा सुरु झाली होती. दरम्यान, सनी देओलवर तब्बल 56 कोटींच कर्ज आहे. पण 56 कोटींचं कर्ज असणाऱ्या सनी देओलची एकूण संपत्ती किती याविषयी अनेकांना माहित नाही आहे.
सनी देओलनं मुंबईत या आलीशान बंगल्याला विकत घेण्यासाठी खूप मोठं कर्ज घेतलं होतं. त्यासाठी त्याला 55.99 कोटींचं व्याजासहीत कर्ज बॅंक ऑफ बडोदाला परत करायचं होतं. ज्याची परतफेड त्यांनी अजून केलेली नाही. अशात बॅंकेनं वर्तमानपत्रात त्याच्या बंगल्याच्या लिलाव करणार असल्याची जाहिरात दिली होती. या बंगल्याच्या लिलावासाठी कमीत कमी रक्कम ही 51.43 कोटी रुपये ठेवली आहे.
सनी देओलच्या बंगला खूप आलीशान आहे. या बंगल्यात पार्किंग पासून स्विमिंग पूल, चित्रपटगृह, हॅली पॅड एरिया, गार्डन आणि अशा अनेक सगळ्या सुविधा आहेत. हा बंगला खूप लक्झरीअस आहे. तर बंगल्या चारही बाजूनं सुंदर दिसतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सनी देओलची एकूण संपत्ती ही 120 कोटींची आहे. तर एका चित्रपटासाठी सनी देओल हा 5 ते 6 कोटींचे मानधन घेतो. मात्र, 'गदर 2' साठी त्यानं 20 कोटी मानधन घेतल्याचं म्हटलं जातं. सनी देओलला लक्झरीअस गाड्या देखील आवडतात. त्याच्या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये Porsche, रेन्ज रोव्हर आणि Audi A8 सारख्या अनेक महागड्या गाड्या देखील आहेत.
हेही वाचा : 'मला पती पाहिजे पण...', लग्न न करण्यावर 47 वर्षांच्या सुष्मिता सेनचं मोठं वक्तव्य
सनी देओलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो नुकताच 'गदर 2' या चित्रपटात दिसला. या चित्रपटानं 10 दिवसात बॉक्स ऑफिसवर जवळपास 377 कोटींची कमाई केली होती. आता फक्त या चित्रपटानं 23 कोटींची कमाई केली तर हा चित्रपट 400 कोटींचा आकडा लवकरच पार करेल अशी अपेक्षा त्याच्या चाहत्यांना आहे. इतकंच नाही तर 'गरद 3' हा चित्रपट लवकरच येणार आहे अशा चर्चा पण रंगल्या आहेत.