'मला पती पाहिजे पण...', लग्न न करण्यावर 47 वर्षांच्या सुष्मिता सेनचं मोठं वक्तव्य

Sushmita Sen's Daughter on her wedding : सुष्मिता सेननं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आजवर लग्न केलं नाही याविषयी मोठा खुलासा आहे. यावेळी सुष्मिता सेननं तिच्या दोन्ही मुलींचं नाव देखील घेतलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 21, 2023, 04:11 PM IST
'मला पती पाहिजे पण...', लग्न न करण्यावर 47 वर्षांच्या सुष्मिता सेनचं मोठं वक्तव्य title=
(Photo Credit : Social Media)

Sushmita Sen's Daughter on her wedding : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही सध्या तिच्या 'ताली' या वेब सीरीजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेननं तृतीयपंथी भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजमध्ये सुष्मिता सेननं गौरी सावंत यांची भूमिका साकारली आहे. सुष्मिता सेन सध्या या सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असली, तरी देखील दुसरीकडे तिचं खासगी आयुष्य चर्चेत आहे. 47 वर्षांची सुष्मितानं अजूनही लग्न केलेलं नाही. यावर तिनं कधीच वक्तव्य केलं नाही. पण आता तिनं लग्नावर स्पष्ट वक्तव्य केलं आहे. तिनं केलेलं वक्तव्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

सुष्मिता सेन वयाच्या 47 व्या वर्षी सुष्मिता सेन अविवाहीत आहे. सुष्मिताला दोन मुली आहेत ज्यांच्यावर ती जिवापाड प्रेम करते. त्यात आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लग्न न करण्यावर आणि तिच्या मुलींना वडिलांची कमी जाणवत नाही का? या प्रश्नावर उत्तर देत सुष्मिता म्हणाली मुळीच नाही. त्यांना वडिलांची गरज नाही. तुम्हाला त्याच गोष्टीची कमी जाणवते जी तुमच्याकडे असते. जे तुमच्याकडे कधी नव्हचं त्याला तुम्ही कसं मिस कराल. जेव्हा मी त्यांना बोलते की मला लग्न करायचं आहे, तेव्हा त्यांचं रिअॅक्शन अशी असते की काय पण का? 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

त्याविषयी बोलताना सुष्मिता सेन म्हणाली, 'मी त्यांना सांगितलं की, पण मला एक नवरा पाहिजे आणि त्याला तुमच्याशी काही घेणं देणं नाही आहे. तर आम्ही त्यावर नेहमीच विनोद करत असतो.' 

हेही वाचा : अभिनेता पंकज त्रिपाठी यांना पितृशोक, वयाच्या 98 व्या वर्षी निधन

सुष्मिता सेनविषयी पुढे बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी सुष्मिता ही ललित मोदी यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरु होती. त्या दोघांचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या. मात्र, त्या दोघांनी या बातमीवर कधीच दुजोरा दिला आहे. त्याआधी सुष्मिता मॉडेल आणि अभिनेता रोहमन शॉसोबत रिलेशनशिपमध्ये होते. त्या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट करण्यात आले होते. ब्रेकअपनंतर देखील रोहमन आणि सुष्मिता अनेकदा लंच किंवा डिनरला कुटुंबासोबत जाताना दिसले. सुष्मिताला दोन मुली असून त्यांची नावं रेने आणि अलीशा अशी आहेत. या दोन्ही मुलींना सुष्मितानं दत्तक घेतलं आहे.