Sunny Deol Networth: सनी देओलची संपत्ती किती? महिन्याला कमवतो इतके कोटी
sunny deol चा आज वाढदिवस आहे. तो महिन्याला किती कोटी कमवतो. जाणून घेऊया.
मुंबई : Bollywood चा अॅक्शन हिरो सनी देओल (Sunny Deol) आज 64 वर्षांचा झाला आहे. आपल्या अभिनयाने त्याने अनेकांची मने जिंकली आहेत. सनी देओलने आतापर्यंत अनेक हिट सिनेमे दिले आहेत. सनी देओलचे डायलॉग आजही त्यांच्या चाहत्यांच्या ओठांवर असतात. त्याने आपल्या करिअरची सुरुवात 1983 मध्ये बेताब या सिनेमातून केली होती. हा सिनेमा खूपच हिट झाला. आज काश्मीरमध्ये जेथे या सिनेमाची शुटींग झाली. त्या जागेला देखील बेताब गल्ली म्हणून ओळखले जाते.
बॉलिवूडमध्ये त्याची बॉर्डर सिनेमातील मेजर कुलदीप सिंहची भूमिका असो किंवा गदर सिनेमातील तारा सिंहची भूमिका असो. सनी देओलने आपल्या अभिनयातून अनेकांची मने जिंकली. त्यानंतर तो राजकारणात आला. सध्या तो भाजपकडून खासदार म्हणून निवडून आला आहे.
भाजपकडून खासदार
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर तो पंजाबच्या गुरदासपूर मतदारसंघातून खासदार झाला. सनी देओल याने त्याची संपत्ती निवडणूक आयोगाच्या घोषणापत्रात जाहीर केली होती.
2019 मध्ये किती होती सनी देओलची संपत्ती?
सनी देओलने लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जाहीर केलेल्या माहितीनुसार त्याच्याकडे 60 कोटींची संपत्ती होती. तर 21 कोटींची स्थायी मालमत्ता आहे. त्याची पत्नी पूजा देओल याच्याकडे 6 कोटींची संपत्ती आहे. ज्यामध्ये 19 लाख रुपये बँकेत तर 16 लाखांची कॅश होती. सनी देओलकडे 1.69 कोटींच्या कार आणि 1.56 कोटींचे दागिने आहेत. तर त्याच्यावर 53 कोटींचं कर्ज असल्याचं देखील त्याने सांगितलं आहे.
2022 मध्ये किती होती संपत्ती?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये सनी देओलची संपत्ती (Sunny Deol Networth) ही 17 मिलयन डॉलर (133 कोटी रुपये) आहे. त्याचं महिन्याचं इनकम एक कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. एका सिनेमासाठी 5 कोटी रुपये घेतो. सनी देओलकडे अनेक लग्जरी गाड्या आहेत. ज्यामध्ये ऑडी 8, रेंज रोवर सारख्या गाड्यांचा समावेश आहे.
बॉबी देओलची संपत्ती किती?
सनी देओल आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवणं पसंद करतात. भाऊ बॉबी देओल (Bobby Deol) सोबत देखील त्यांचं बॉन्डिंग आहे. बॉबी देओल (Bobby Deol Property) यांची संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2022 मध्ये बॉबी देओलची संपत्ती 10 मिलियन डॉलर होती. बॉबी देओल महिन्याला 50 लाख रुपये कमवतो. सिनेमा आणि जाहिरातींमधून ते पैसे कमवतात.