Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओल हा त्याच्या 'गदर 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सनी देओलच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 513 कोटींची कमाई केली. या चित्रपटात सनी देओलनं तारा सिंगची भूमिका साकारली होती तर अमीषा पटेलनं सकीना ही भूमिका साकारली होती. तर हा चित्रपट 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर' या चित्रपटाचा दुसरा भाग आहे. दरम्यान, सनी देओल हा एक राजकारणी आणि गुरदासपुरचा खासदार देखील आहे. या सगळ्यात आता सनी देओलनं त्याच्या राजकारणातील करिअरविषयी वक्तव्य करत 2024 मध्ये राजकाराणात उतरणार का यावर वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 मध्ये सनी देओलनं भारती जनता पार्टीत पदार्पण करत निवडणूक लढवली होती. निवडणूक जिंकल्यानंतर सनी देओलवर लोकसभेतील कमी उपस्थितीवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर एका मुलाखतीत प्रश्न विचारता सनी देओल म्हणाला की 'माझी उपस्थिती ही कमी आहे आणि मी बोलत नाही की ही चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा मी राजकारणात आलो तेव्हा मला या गोष्टीची जाणीव झाली की हे माझं जग नाही. पण तरी सुद्धा माझ्या मतदार संघासाठी काम करत आहे आणि मी करत राहिन. मी लोकसभेत जातो की नाही या गोष्टीचा माझ्या कामावर परिणाम होत नाही. जेव्हा मी लोकसभेत जातो तेव्हा मला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. सुरक्षा आहे आणि मग कोरोना होता. एक अभिनेता असल्यानं आपण जिथेपण जातो तिथे लोक आपल्या अवतीभोवती गोळा होतात.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


पुढे सनी देओल म्हणाला की 'मी माझ्या मतदार संघासाठी जे काम केलं आहे त्याची यादी आहे, पण मी त्या लोकांपैकी नाही जो काम केल्यानंतर त्याचा गोंगाट करेन. जर राजकारणाविषयी बोलायचे झाले तर हो मी या कामासाठी बनलेलो नाही.'


हेही वाचा : जेव्हा हॉलिवूडच्या दिग्गज निर्मात्याला शाहरुखने दिला होता नकार, दिले होते 'हे' कारण!


पुढे 2024 मध्ये निवडणूकीत उभा राहणार का? या प्रश्नावर सनी देओल म्हणाला की 'मला अजून निवडणूनकीत लढायचं नाही. मोदी जी यांना देखील माहित आहे की हा मुलगा सनी त्याच्या चित्रपटांच्या माध्यमातून देशाची सेवा करतोय, तर त्यानं असंच काम करत रहायला हवं.'