Sunny Deol : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 'गदर 2' आणि खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा  'ओएमजी 2' हा चित्रपट एकत्र प्रदर्शित होणार आहेत. हे फक्त एकाच महिन्यात नाही तर एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही चित्रपट 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहेत. त्यामुळे या दोन्ही चित्रपटांमध्ये टक्कर होणार असल्याच्या चांगल्याच चर्चा सुरु झाल्या आहेत. दरम्यान, दोन्ही कलाकार हे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशात नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सनी देओल या क्लॅशवर म्हणाला की 2001 मध्ये त्याचा 'गदर: एक प्रेम कथा' हा चित्रपट आमिर खानच्या 'लगान' चित्रपटासोबत प्रदर्शित होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की त्याला कळत नाही की लोक अशा प्रकारे चित्रपटांची तुलना का करतात. त्यावेळी त्यानं 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'गदर: एक प्रेम कथा' या चित्रपटाच्या कलेक्शनची सगळ्यांना आठवण करून दिली आणि म्हणाला, ''गदर: एक प्रेम कथा' नं 100 कोटींचा आकडा पार केला होता. तर लगाननं त्याहून कमी कमाई केली. मला कळतं नव्हतं की लोक अशी तुलना का करतात. मग तो बिझनेस असो किंवा मग चित्रपट. गदर विषयी काही विचार नाही आहेत, लोकांना वाटतं की हा मसाला चित्रपट आहे. हा एक जुन्या पद्धतीचा चित्रपट आहे, जुन्या वेळची गाणी आहेत. दुसरीकडे लोकांना वाटलं होतं की लगान क्लासिक आहे.'



सनी देओल पुढे म्हणाला की 'काही लोकांनी तर चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच 'गदर' विषयी अनेक उलट्या सुलट्या गोष्टी बोलण्यास सुरुवात केली होती. पण त्यानंतर हा प्रेक्षकांना आवडणारा चित्रपट ठरला. मला आठवण आहे की अवॉर्ड शोमध्ये त्यांनी 'गदर' ची खिल्ली उडवली होती. पण आम्हाला त्याचा काही फरक पडला नव्हता. असंच माझ्या काही इतर चित्रपटांसोबत झालं. त्यात घायल आणि दिल हे चित्रपट क्लॅश झाले होते. त्यात कोणती तुलना नाही पण तरी देखील लोकांना हे करायचं होतं. त्यांना तुनला करणं आवडतं.' 


हेही वाचा : अरे हे काय... नाशिककर व्यक्ती अजय देवगणसाठी मागतोय भीक; कारण जाणून वाटेल आश्चर्य


गदर विषयी बोलायचे झाले तर अनिल शर्मा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात सनी देओलसोबत मुख्य भूमिकेत अमीषा पटेल दिसत आहे. ‘ओह माय गॉड २’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात अक्षय कुमार महादेवाच्या भूमिकेत दिसणार आहे.