मुंबई : अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. आता बॉलिवूड अभिनेता आणि गुरूदासपूरचा भाजप खासदार सनी देओल (Sunny Deol) ला कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. हिमाचल प्रदेशचे आरोग्य सचिव अमिताभ अवस्थी यांनी याबाबत मंगळवारी माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमिताभ अवस्थी यांनी सांगितलं की, सनी देओल गेल्या काही दिवसांपासून कुल्लू जिल्ह्यात राहत होते. मंगळवारी सनी आणि त्याचे काही मित्र मुंबईला रवाना होणार होते. मात्र त्याचवेळी त्यांची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली. 


सनी देओल अनेकदा हिमाचलमध्ये येतात. यावेळी तो खांद्याच्या सर्जरीनंतर आराम करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबिय देखील होते. काही दिवसांनी त्यांचे कुटुंबिय परतले मात्र आता सनी देओलला कोरोनाची लागण झाली आहे. 


६४ वर्षीय अभिनेता सनी देओल यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत आपल्या खांद्याची सर्जरी केली होती. त्यानंतर ते मनालीत आराम करण्यासाठी फार्म हाऊसमध्ये गेले होते. ३ डिसेंबरला सनी देओल मुंबईत परतणार होते. पण त्या अगोदरच त्यांना कोरोनाची लागण झाली