मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) सोबत घोटाळा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने तिला मोठा धक्का बसला आहे. मात्र या घोटाळ्यामधून चाहत्यांची फसवणूक टाळण्यासाठी तिने आता त्यांना आवाहन केलं आहे.त्यामुळे नेमका तिच्यासोबत असा कोणता घोटाळा घडला होता, हे जाणून घेऊयात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री सनी लिओनीचे (Sunny Leone) नाव आणि फोटो वापरून एक इवेंट चालवला जाणार होता.या संबंधित जाहिरातबाजी देखील झाली होती. ही जाहिरात पाहताच सनी लिओनी हा मोठा घोटाळा असल्याचे सांगितले. तसेच ती या इवेंटचा भाग नसल्याचेही तिने स्पष्ट केले आहे. 


प्रकरण काय? 
सनी लिओनीने (Sunny Leone Scam) ट्विटरवर एक पोस्टर शेअर केला आहे. ज्यामध्ये सनी लिओनचा फोटो आणि नाव वापरून थायलंडमध्ये पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे दिसत आहे. या पोस्टरमधून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या पोस्टरमध्ये असे लिहिले आहे की, अवॉर्ड्स ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून थायलंडमध्ये नवीन वर्षाचे सेलिब्रेशन होणार आहे. पोस्टरमध्ये एका बाजूला सनी लिओनीचा (Sunny Leone Scam) फोटो छापण्यात आला असून त्यात ती पाहुणी म्हणून येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.



सनी लिओनीचे चाहत्यांना आवाहन 
सोमवारी सनी लिओनीने (Sunny Leone Scam) खुलासा केला की, मी या कार्यक्रमाचा भाग नाहिए.तसेच अशा बनावट कार्यक्रमासाठी आयोजकांना आपले नाव वापरण्याचा अधिकार नाही, असे तिने संतापत म्हटले आहे. तसेच मी त्या कार्यक्रमात सहभागी नसल्यामुळे अशा कोणत्याही फसवणुकीस बळी पडू नये, असा इशारा तिने चाहत्यांना दिला आहे.


सनी लिओनी (Sunny Leone Scam) सोशल मीडियावर खुप सक्रिय असते. सोशल मीडियावर ती कुटुंबासोबत फोटो शेअर करत असते. तिने डॅनियल वेबरशी लग्न केले आहे. या जोडप्याला निशा, आशेर आणि नोहा अशी तीन मुले आहेत. दरम्यान इतर सेलिब्रिटींप्रमाणे सनीलाही तिच्या कुटुंबासाठी अनेकदा ट्रोल केले जाते. 


सनी लिओनी (Sunny Leone) शेवटची एमएक्स प्लेयरच्या 'अनामिका' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. आता आगामी ती कोणत्या चित्रपटात अथवा सीरिजमध्ये काम करते याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.