मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि तिचे पती डेनियल वेबर यांनी काही दिवसांपूर्वीच २१ महिन्यांच्या मुलीला दत्तक घेतले. सनीने ही माहिती सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांना दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनीने ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर काहींनी तिला शुभेच्छा दिल्या तर काहींनी तिच्यावर टीकाही केली. 


याचदरम्यान सनीने दत्तक घेतलेल्या मुलीबाबत एक बाब समोर आलीये. ज्या मुलीला सनीने दत्तक घेतलेय त्या मुलीला याआधी ११ कुटुंबानी दत्तक घेण्यास नकार दिला होता. मुलांना दत्तक देणाऱ्या CARA या संस्थेने ही माहिती दिलीये. सनी आणि तिचे पती डेनियलनी या मुलीला महाराष्ट्राच्या लातूरमधून दत्तक घेतलेय.


सनीने दत्तक घेतलेल्या मुलीचे नाव निशा कौर वेबर ठेवलेय. मुलगी दत्तक घेण्याच्या आधी सनी आणि तिचे पती मुलासाठी प्लॅनिंग करत असल्याची बातमी आली होती. त्यावेळी सनीने असे कोणतेही प्लॅनिंग सुरु नसल्याचे म्हटले होते.