किडनी प्रत्यारोपणासाठी सनी लिओनी मागतेय चाहत्यांकडे आर्थिक मदत
अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वी दोन जुळ्यांचं आगमन झालं आहे.
मुंबई : अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वी दोन जुळ्यांचं आगमन झालं आहे. निशा, अशर आणि नोहा या तिन्ही मुलांसोबत आनंदात असलेले सनी आणि तिचा पती डॅनियल आता मात्र चिंतेत पडला आहे. सनी लिओनीने एका भावूक इंस्टाग्राम पोस्टद्वारा तिच्या चाहत्यांकडे मदत मागितली आहे.
किडनीच्या उपचारांसाठी मदत
इंस्टाग्राम पोस्टद्वारा सनीने तिचा मानलेला भाऊ प्रभाकरसाठी आर्थिक मदत माहितली आहे. सनीने लिहलेल्या पोस्टमध्ये प्रभाकर हा सनी आणि डॅनियल घरात नसताना तिच्या मुलांची काळजी घेत असल्याचे तिने लिहलं आहे.
काही दिवसांपूर्वी प्रभाकरची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र त्याच्यावर चूकीचे उपचार झाले.परिणामी किडनी खराब झाल्याचे सनीने सांगितले आहे.
सनीने आणि तिच्या पतीने प्रभाकरला सध्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. तेव्हा प्रभाकरला किडनी ट्रान्सप्लान्ट करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र या उपचारांसाठी आर्थिक मदत असल्याने तिने फॅन्सकडे मदत मागितली आहे.
नुकताच सनी लिऑनीवर एक खास बायोपिक डिजिटल मीडियामध्ये रिलिज करण्यात आली आहे. या बायोपिकमध्ये सनीने स्वतःच तिचा भूतकाळ रसिकांसमोर उलगडून दाखवला आहे.