मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन सोशल मीडिया क्वीन म्हणून ओळखली जाते. अभिनेत्री आपल्या पोस्टने लोकांचं मनोरंजन करते. मात्र या दिवसांत सनीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती जखमी अवस्थेत दिसत आहे. अभिनेत्रीचा असा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना झटका बसत आहे. आणि ते जाणून घेवू ईच्छितात की, अखेर सनीला झालं काय आहे. मात्र हा फोटो त्यांच्या अपकमिंग वेबसिरीजसाठी जोडलेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी लिओनीची वेबसिरीज 
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा ओटीटीवर धमाकेदार पद्धतीने येण्यासाठी सज्ज आहे. सनी लिओनीची ही वेबसिरीज अनामिका १० मार्चला रिलीज झाली आहे. अनामिका थिएटर्समध्येच नाही तर ओटीटी प्लॅटफॉर्म एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम केली गेली. सिनेमा रिलीज होण्याआधी आपल्या सोशल मीडिया हँन्डलवर 'अनामिका'चं सवी लिओनीने प्रमोशन केलं आहे. 



जखमी अवस्थेत दिसली सनी
अभिनेत्री सोशल मीडियावर असे फोटो शेअर करत आहे. ज्यामध्ये तिच्या शरीर आणि चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत. नुकतीच अभिनेत्रीने अनामिकाचा असा फोटो शेअर केला आहे जो पाहून तुमच्या अंगावर काटा येईल. या फोटोमध्ये सनी हॉस्पिटलच्या बेडवर पडलेली दिसत आहे. आणि तिच्या चेहऱ्यापासून ते पाठीवर जखमेचे निशाण दिसत आहेत. सनी लिओनच्या अनामिका वेब सीरिजचे 8 एपिसोड स्ट्रिम केले गेले आहेत. ज्यामध्ये समीर सोनी, सोनाली सहगल, राहूल देव, शहजाद शेख आणि अयाज खान सारखे स्टार्स मुख्य भूमिकेत दिसत आहेत.