महाराष्ट्राच्या `आमदार निवास`मध्ये शिरली Sunny Leone,नेमकं प्रकरण काय जाणून घ्या!
आपल्या बोल्डनेसने सगळ्यांना वेड लावणारी सनी लिओनी नेहमी कोणत्या नं कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
मुंबई : आपल्या बोल्डनेसने सगळ्यांना वेड लावणारी सनी लिओनी नेहमी कोणत्या नं कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता मात्र सनी लिओनची चर्चा एका वेगळ्या कारणासाठी आहे. आणि हे कारण म्हणजे नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार सनी आमदार निवासात शिरल्याच समजतय! आता तुम्ही म्हणाल हे काय नवं प्रकरण? जर हे वाचून तुम्ही गोंधळात पडला असाल तर आमचा हा रिपोर्ट नक्की वाचा
बॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर अभिनेत्रीने आता आपला मोर्चा प्रादेशिक सिनेमांकडे वळवला आहे. तेलगू तामिळ मल्याळम आणि कन्नड इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवल्यानंतर सनी लवकरच मराठीतील दुसऱ्या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. याआधी सनी बॉईज या मराठी चित्रपटाच्या 'कुठं कुठं जायच हनिमूनला' या गाण्यावर थिरकली होती.
लवकरच सनी लिओनी संजीव कुमार राठोड निर्मित व दिग्दर्शित मराठी चित्रपट आमदार निवासामध्ये 'शांताबाई' या गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. या मराठी आयटम साँग ची बॉलीवुडने सुद्धा दखल घेतली असून या गाण्याची चर्चा बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा रंगू लागली असून आधुनिक 'शांताबाई'चा अवतार पाहायला सगळेच उत्सुक आहेत.
२०१५ मध्ये शांताबाई या गाण्याने महाराष्ट्रातच नाही संपूर्ण जगात अक्षरश: धुमाकुळ घातला होता. आतापर्यंत युट्युबवर या गाण्याला ८५ करोड हुन जास्त व्हूज मिळाले असून सुमीत म्युझिकच्या मालकीचे हे गाणं आता जय जगदंब प्रोडक्शनने घेतलं आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर विष्णू देवाने या आयटम साँगचं नृत्यदिग्दर्शन केलं आहे. सामाजिक आणि राजकीय गोष्ट सांगणारा चित्रपट 'आमदार निवास' लवकरच चित्रपट गृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.