सनी लिओनीच्या बॉडीगार्डचं मानधन ऐकून व्हाल थक्क
गेल्या काही दिवसांपासून सनी आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत आहे.
मुंबई : अभिनेत्री सनी लिओनीने अभिनय क्षेत्रात एक वेगळं स्थान प्रस्थापित केलं आहे. आताच्या घडीला तिच्या चाहत्यांची देखील फार मोठी आहे. सनीची लोकप्रियता देखील दिवसागणिक वाढत आहे. एखाद्या कार्यक्रमात सनी पोहोचली तर तिची एक झलक पाहाण्यासाठी चाहत्यांची एकच गर्दी जमते. चाहत्यांच्या या जमलेल्या गर्दीतून तिचे संरक्षण करण्यासाठी तिचा बॉडीगार्ड कायम तिच्या सोबत असतो. सनीच्या बॉडीगार्डचे नाव आहे. यूसुफ इब्राहीम. गेल्या दोन वर्षांपासून यूसुफ सनीची रक्षा करत आहे. शिवाय सनीसोबत त्याचे सोशल मीडियावर अनेक फोटो देखील आहेत.
सनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीपासून ते दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत आहेत. शिवाय २०१७ साली यूसुफला राखी बांधताना देखील त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला होता. सनीचा पती डॅनिअल वेबरसोबत देखील यूसुफचे चांगले संबंध आहेत.
दरम्यान, मीडिया रिपोर्टच्या सांगण्यानुसार सनी तिच्या बॉडीगार्डला वर्षाला तब्बल १ कोटी रूपयांचं मानधन देत असल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सनी आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत आहे. ती ऑगस्टमध्ये पुन्हा भारतात येणार असल्याच्या चर्चा सध्या रंगत आहेत.
मुंबईत कोरोना रुग्णांची आणि मृतांची स्थिती पाहता सनीने पती डॅनिअल वेबर आणि त्यांच्या तीन मुलांसह लॉकडाऊन काळात भारत सोडण्याचा निर्णय घेतला. भारतातील कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव आणि मुलांचा विचार करून अमेरिकेत जाण्याचा निर्णय आम्ही घेतला. असं तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले होते.