मुंबई : बॉलीवुड अभिनेत्री सनी लियॉनी लवकरच 'वीरमादेवी' मध्ये दिसणार आहे. या सिनेमाचा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज करण्यात आलाय. सनी लियॉनीने आपल्या ट्विटर हॅंडलवर या सिनेमातील एक व्हिडिओ शेयर केलाय. 'तुमच्या सर्वांसोबत शेयर करताना मला उत्साह वाटत आहे' असे सनीने लिहिले.


'वीरमादेवी' चा फर्स्ट लुक 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सनी लियॉनी 'वीरमादेवी' सिनेमातून तामिळ सिनेमात डेब्यू करते. हा एक पीरियड ड्रामा असून याचा फर्स्ट लुक पोस्टर रिलीज करण्यात आलाय. 'वीरमादेवी' सनी लियॉनी एका योद्ध्याच्या रुपात दिसणार आहे. तामिळसोबतच हा सिनेमा कन्नड, मल्याळम, तेलुगू आणि हिंदीमध्येदेखील रिलीज करण्यात येणार आहे. सिनेमाच्या पोस्टरमध्ये सनी योद्धा असलेली पाहायला मिळत आहे. घोड्यावर बसलेली सनी युद्धाच्या मैदानात दिसतेय. 


शूटिंग सुरू 


सध्या या सिनेमाचे शूटिंग सुरू आहे. शूटिंग इन प्रोग्रेस असं या सिनेमाच्या पोस्टरमध्ये लिहिलयं  या सिनेमासाठी ती तलवारबाजी शिकली आहे. साऊथ सिनेसृष्टीत काम करण्याची सनीची ही पहिलीच वेळ आहे.