सनी लिओनला का आवडत नाही पारंपरिक कपडे? टीका करत म्हणाली...
सनी लिओन आपल्या हॉटनेसमुळे ओळखली जाते.
मुंबई : सनी लिओन इंडस्ट्रीमधील एक अशी अभिनेत्री आहे जी, आपल्या हॉटनेसमुळे ओळखली जाते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. असाच एक व्हिडिओ सनीने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलाय. जो सनीच्या चाहत्यांकडून खूप पसंत देखील केला जात आहे.
सनीने शेअर केलाला व्हिडिओ मेकअपरुममधील असल्याचं दिसत आहे. ज्यात मेकअप आर्टिस्ट तिला तयार करताना दिसत आहेत. ड्रेस फिटींग होत नसल्याने सनी जे म्हणते ते ऐकून तिच्या चाहत्यांना विश्वास बसत नाहीये
सनी लिओनीने नुकताच तिच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती म्हणताना दिसत आहे की, 'या ड्रेसची समस्या ही आहे की, जो एका बाजूने मोठा आणि एका बाजूने लहान आहे. आधी शोल्डर फिटींग करा, मग पिनअप करा पुन्हा स्टिच करा पारंपरिक कपड्यांमध्ये हे असंच घडतं.
शोल्डर आणि पिन हे असच सगळं ईथे पहायला मिळतं. आता तुम्हीचं बघा एका कामात ईथे चार जण गुंतले आहेत. या व्हिडिओबाबत युझर्सकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
सनी लिओनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तिला 'कलयुग' सिनेमात अप्रोच करण्यात आलं होतं. ज्यासाठी तिने भरमसाठ फी मागितली आणि अखेर हा चित्रपट थांबला. यानंतर सनी बिग बॉस 5 मध्येही दिसली होती. कलियुगनंतर सनीने 2012 मध्ये 'जिस्म 2' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर सनी जॅकपॉट, रागिनी एमएमएस 2 , एक पहली लीला, कुछ कुछ लोचा है, मस्तीजादे, वन नाईट स्टँड या सिनेमात दिसली आहे. सध्या ती स्प्लिट्सव्हिला आणि 'शेरो'च्या प्रोजेक्टवर काम करत आहे.