Sunny Leone सोबत घडला धक्कादायक प्रकार, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती
Sunny Leone चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तिनं सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत सनी लिओनीनं संपूर्ण प्रकरण सांगितलं आहे. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट करत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Sunny Leone Linkedin Account Blocked : बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच अभिनेत्री आणि डान्सर सनी लिओनी (Sunny Leone) सध्या फिल्मी जगतापासून दूर असल्याचं दिसून येतंय. असं असलं तरी सनी सोशल मीडियावर मात्र चांगलीच सक्रिय असते. सनीने सुरुवातीला अनेक अडल्ट चित्रपटांमध्ये काम केले. त्यानंतर सनी भारतात आली. सनीचे ‘बेबी डॉल’ हे आयटम साँग हिट ठरले. या गाण्यानंतर जणू तिचं आयुष्यच बदललं. त्यातही ‘बिग बॉस’च्या पाचव्या पर्वात तिने सहभाग घेतला. यावेळी खऱ्या आयुष्यात सनी कशी आहे, हे प्रेक्षकांना समजलं. सनी सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, सनी लिओनीनं सध्या सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ‘लिंक्डइन’नं तिचं अकाऊंट ब्लॉक केल्याचा खुलासा तिनं केला आहे. (Sunny Leone Linkedin Account)
सनीनं काही दिवसांपूर्वीच लिंक्डइनवर तिचं अकाऊंट बनवलं होतं. त्यानंतर सनी लिंक्डइनवर प्रचंड अॅक्टिव्ह होती. त्यानंतर अचानक सनीचं अकाऊंट ब्लॉक करण्यात आलं आहे. याविषयी सांगत सनीनं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. खरंतर सनीनं तिच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सनी बोलते की काही महिन्यांपूर्वी मी लिंक्डइनवर अकाऊंट सुरु केलं होतं. तिथे खूप छान वेळ घालवल्यानंतर आता त्यांनी माझं अकाऊंट ब्लॉक केलं आहे. त्याच कारण म्हणजे मी खरी सनी लिओनी नाही, पण ती मीच आहे. दरम्यान, सनीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
हेही वाचा : कंडोम वापरावर Rakul Preet Singh चं मोठ वक्तव्य, म्हणाली...
हा व्हिडीओ शेअर करत सनी पुढे म्हणाली की मला कळतंय की माझं नवीन अकाऊंट होतं आणि त्यावर अचानक खूप ट्रॅफिक येऊ लागलं होतं. लिंक्डइन पण खरंच माझं अकाऊंट बंद किंवा मग डिलीट करण्यासाठी हे खरं कारण नाही. त्यांनी त्यांचं मत बदलावे अशीच माझी इच्छा आहे आणि ते त्यांचा निर्णयही बदलतील. त्यांनी तर एक मेल करण्याचे कष्ट देखील घेतले नाही. सनीचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला, त्यांनी नीट तपासनी केली नसेल. दुसरा नेटकरी म्हणाला, कोणाचही अकाऊंट अशाप्रकारे ब्लॉक करणं चुकीचं आहे.