मुंबई : अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती, चाहत्यांना स्वतःच्या
 खासगी आयुष्याबद्दल देखील सांगत असते. आता देखील सनीने तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत, जीवनातील कठीण आठवणी सर्वांसोबत शेअर केल्या आहेत. सध्या तिच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोटो शेअर करत तिने कॅप्शन मध्ये, 'आमच्या लग्नाला 11 वर्ष झाली आहेत. ती अशी वेळ होती, जेव्हा आमच्याकडे एक रुपयाही नव्हता. लग्नात 50 पेक्षा कमी लोक होते. लिफाफ्यातून आलेल्या पैशातून फुले आणली... असं लिहिलं आहे...



आज लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाल्यामुळे सनीने लग्नाचा फोटो शेअर करत जोडीदारावर प्रेम व्यक्त केल आहे. सध्या सनीची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 


सनीच्या लग्नाचे फोटो पाहून तुमच्या देखील काही आठवणी जाग्या झाल्या असतील.