सनी लिओनीने (Sunny Leone) बॉलिवूडमध्ये आता आपली एक ओळख निर्माण केली आहे. एकेकाळी अ‍ॅडल्ट चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या सनी लिओनीचं बिग बॉसमुळे (Big Boss) नशीब पालटलं. बिग बॉसनंतर सनी लिओनीला बॉलिवूडमधून (Bollywood) ऑफर्स मिळू लागल्या. अनेक चित्रपटांमध्ये तिने मुख्य भूमिकाही साकारल्या. अनेक दिग्गज अभिनेत्यांसह सनी लिओनी झळकली आहे. मात्र यानंतरही तिचा 'अ‍ॅडल्ट फिल्ट स्टार' (Adult Film Star) असा उल्लेख केला जातो. नुकतंच तिने आपल्यासाठी वापरण्यात येणाऱ्या या टॅगवर प्रतिक्रिया दिली आहे. Galatta India ला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्याला हा टॅग का आवडत नाही याबद्दल सांगितलं.  



'लक्ष वेधण्यासाठी अ‍ॅडल्ट स्टार टॅग वापरला जातो'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनी लिओनीला मुलाखतीत तिच्या बॉलिवूडमधील सुरुवातीच्या दिवसांमधील संघर्षाबद्दल विचारण्यात आलं जेव्हा तिच्या भूतकाळातील करिअरच्या आधारे न्याय दिला जात होता. ती म्हणाली की, “मला असं वाटते की माझ्या सुरुवातीच्या काळात येथे भारतात असताना, लोक तुमच्यासाठी एखादा निश्चित शब्द किंवा टॅग वापरणं अपेक्षित आहे. ते पूर्णपणे सामान्य आहे. पण आपण आताही त्याबद्दल बोलत असू तर मला वाटतं की हे अधिक त्रासदायक आहे. कम ऑन! मला इथे येऊन 13 वर्षं झाली आहेत. आपण जर या गोष्टी जाऊच दिल्या नाहीत तर आपण पुढे कसे जाणार? आता वेळ आली आहे. हा आता मनोरंजक वाटेल असा संभाषणाचा भाग नाही. माझ्या आयुष्यात घडलेली गोष्ट तुम्हाला माहीत आहे. आपण सर्वांनी खूप काम केलं असून आपापल्या पद्धतीने वाटचाल केली आहे. वाचकांचं लक्ष वेधण्यासाठी प्रकाशनाने याचा वापर करणं हे मला फार विचित्र वाटतं”.


सनी लिओनीचा जन्म कॅनडातील ओंटारियो येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. तिचं खरं नाव करनजीत कौर वोहरा आहे. तिच्याकडे कॅनेडियन आणि अमेरिकन असं दुहेरी नागरिकत्व आहे. तिच्या अभिनय कारकिर्दीव्यतिरिक्त, अमेरिकन कॅन्सर सोसायटीसाठी पैसे उभारण्यासाठी तिने रॉक 'एन' रोल लॉस एंजेलिस हाफ-मॅरेथॉनसह अनेक मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. तिने पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स (PETA) च्या जाहिरात मोहिमेसाठी सुटका केलेल्या कुत्र्यासह पोझदेखील दिली होती. 


सनी लिओनीचं अँक्टिंग करिअर


सनीने बिग बॉससह भारतीय मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्धी मिळवली. तिने पूजा भट्टच्या जिस्म 2 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. नंतर शूटआउट ॲट वडाला, रागिनी एमएमएस 2, हेट स्टोरी 2 अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले.