रजनीकांतच्या मुलीच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब
सौंदर्या रजनीकांत आणि आर अश्विन यांच्या घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिनं गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
मुंबई : सौंदर्या रजनीकांत आणि आर अश्विन यांच्या घटस्फोटावर अखेर शिक्कामोर्तब झालाय. सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या हिनं गेल्या वर्षी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
सौंदर्या आणि अश्विन यांच्या लग्नाला सात वर्ष झालेत... २०१० मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. हा घटस्फोट दोघांच्याही संमतीनं घेतला गेलाय. गेल्या सात महिन्यांपासून हे दोघे वेगवेगळे राहत होते. या जोडप्याला दोन वर्षांचा मुलगाही आहे. अश्विन एक बिझनेसमन आहे.
काही दिवसांपूर्वी बोलताना सौंदर्यानं, बहिण ऐश्वर्याचा पती धनुष आणि वडील रजनीकांत यांची लाईफस्टाईल एकसारखीच होती... त्यामुळे बहिणीला लग्नानंतर फार कठिण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं नाही... परंतु, मला लग्नानंतर तीन वर्षानंतरही अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागलं आणि मी आत्तापर्यंत परिस्थितीशी जुळवून घेण्याचाच प्रयत्न करत राहिले... कारण अश्विनची लाईफस्टाईल खूपच वेगळी होती, असं म्हटलं होतं.
दोघांच्या कुटुंबांनीही हे लग्न वाचवण्याचा खूप प्रयत्न केला... परंतु, सौंदर्या आपल्या निर्णयावर ठाम राहिली.