मुंबई : साऊथचे सुपरस्टार रजनीकांत लवकरच मराठी सिनेमात दिसणार आहेत. आता सुपरस्टार रजनीकांत यांना मातृभाषेतही अनुभवता येणार. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मूळचे मराठमोळे असलेले शिवाजीराव गायकवाड म्हणजे दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार रजनीकांत आता आपली जादू मराठी सिनेमांमध्ये दाखवणार आहेत. दिग्दर्शक दिपक भावे यांच्या आगामी चित्रपटात रजनीकांत आणि दाक्षिणात्य अभिनेता मामुटी दिसणार आहेत. "पसायदान" असं या सिनेमाचं नाव असून या दोघांची सिनेमात मुख्य भूमिका आहे. 


जाणून घ्या सिनेमाबद्दल


बाळकृष्ण सुर्वे या सिनमाची निर्मिती करत आहेत. तर दिपक भावे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. दिपकने लिहिलेला ‘इडक’ या सिनेमाची इफ्फी मध्ये निवड झाली आहे. तामिळ भाषेतील सिनेमात असंख्य विक्रम रचलेले आणि लाखो फॅन फॉलोअिंग असलेले रजनीकांत आता मराठी सिनेमांत विक्रम रचण्यासाठी सज्ज झाले आहेत. 


 सिनेसृष्टीत ते सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या सिनेमाचे बजेटही मोठे असते. असे, असले तरी त्यांचा अद्याप मराठीत कोणताही सिनेमा आलेला नाही. मात्र, आता ते लवकरच मराठी सिनेसृष्टीत झळकणार आहेत. जानेवारी किंवा फेब्रुवारीपासून सिनेमाचे शूटिंग सुरु होणार असल्याचे निर्माते बाळकृष्ण सुर्वेंनी सांगितले आहे.