Bollywood : बॉलिवूडमध्ये सगळेच स्टार्स कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. अनेकदा ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतात. हे स्टार्स नेहमीच लक्झरी लाइफस्टाइल जगतात अनेकदा ही लक्झरी लाइफस्टाइल (luxury lifestyle) जगतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्याजवळ महागड्या मोठमोठ्या अपार्टमेंट्सपासून ते महागड्या आणि भरपूर आलिशान गाड्या असतात त्यांच्यासाठी हे सगळं सामान्य आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं जीवन जगण्यासाठी नक्कीच खूप मेहनत घ्यावी लागते मेहनतीशिवाय हे सगळं उभं करणं थोडं अशक्यच आहे. पण चाहत्यांना नेहमीच त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइल संदर्भात उत्सुकता लागलेली असते. आज आम्‍ही तुम्‍हाला एका महिन्‍याच्‍या 6 बड्या बॉलिवूड स्‍टार्सचे वीज बिल सांगणार आहोत, जे ऐकून तुम्‍हाला आश्चर्य वाटेल. (superstars of Bollywood Electricity bill you will be shocked to hear nz)


हे ही वाचा - 'चादर ओढून सीटवर ठेवले शारिरीक संबध' ; या 5 स्टार ज्यांनी  सांगितली स्वतःचीच 'ती' स्टोरी


 



1 शाहरुख खान (Shah Rukh Khan)


बॉलिवूडचा किंग खान म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान मुंबईतील मन्नत या आलिशान घरात राहतो. ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे. त्यांच्या घराच्या एका महिन्याच्या विजेचा खर्च 45 लाख ते 50 लाख रुपये आहे.


 


2 सलमान खान (salman khan)


बॉलीवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानकडेही मुंबईत खूप महागडे अपार्टमेंट आहे आणि त्याच्या अपार्टमेंटचे एका महिन्याचे वीज बिल सुमारे २५ ते ३० लाख रुपये येते.


हे ही वाचा - लग्न ठरलं म्हणून गेला बाबा श्यामच्या दर्शनासाठी...पण नियतीने खेळ रचला



3 अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)


बॉलीवूडचे मेगास्टार म्हणजेच अमिताभ बच्चन हेही लक्झरी लाइफस्टाइल जीवन जगण्यात पसंती दाखवतात. आणि त्यांची मुंबईत अनेक घरे आणि बंगले आहेत. मात्र ते जुहू येथील बंगल्यात कुटुंबासोबत राहणे पसंत करतात. आणि त्या घराचे वीज बिल 20 ते 25 लाख रुपये येते.


 


4 सैफ अली खान आणि करीना कपूर (Saif Ali Khan and Kareena Kapoor)


सैफ अली खान आणि करीना कपूर यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. आणि तेव्हापासून दोघेही एकाच बंगल्यात राहतात. त्यांचा बंगलाही मुंबईत आहे. आणि त्यांच्या बंगल्याचे एका महिन्याचे वीज बिल सुमारे 30 ते 35 लाख रुपये आहे.


हे ही वाचा - Optical Illusion : 'या' फोटोतली मांजर  शोधून दाखवा, तुमच्याजवळ फक्त 15 सेकंद



5 दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग (Deepika Padukone and Ranveer Singh)


दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग मुंबईत 4 BHK फ्लॅटमध्ये राहतात. आणि दीपिका आणि रणवीर सिंगचे एका महिन्याचे वीज बिल 15 ते 20 लाख रुपये येते.


 


6 कतरिना कैफ आणि विकी कौशल (Katrina Kaif and Vicky Kaushal)


गेल्या वर्षी अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशलचे लग्न झाले होते. तेव्हापासून दोघेही मुंबईत ४ बीएचके फ्लॅटमध्ये एकत्र राहत आहेत. आणि त्यांचे एका महिन्याचे वीज बिल सुमारे 12 ते 15 लाख रुपये आहे.