नवी दिल्ली : ‘पद्मावत’ सिनेमाच्या निर्मात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार हा सिनेमा देशातील सर्वच राज्यात होणार रिलीज होणार आहे. भाजपचे राज्य असणाऱ्या राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि हरियाणामध्ये संजय लीला भन्सालींच्या पद्मावत चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे या सिनेमाच्या निर्मात्यांनी आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 


काय म्हणाले कोर्ट?


‘जर राज्य या सिनेमावर प्रतिबंध लावत आहेत तर ही भारतीय व्यवस्थेवर हल्ला आहे. हा गंभीर विषय आहे. जर कुणाला याबाबत समस्या असेल तर ते कायद्याची मदत घेऊ शकतात. राज्य सिनेमाच्या कथेला हात लावू शकत नाहीत’. आणि चित्रपटाला सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी राज्य सरकारांची आहे आणि ती त्यांनी पार पाडायला हवी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. 





२५ तारखेला होणार रिलीज


‘पद्मावत’ सिनेमाचे निर्माते काही राज्यांमध्ये या सिनेमावर घालण्यात आलेल्या बंदीच्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले होते. सेन्सॉर बोर्ड द्वारे देण्यात आलेल्या तारखेनुसार हा सिनेमा २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. हा सिनेमा हिंदीसहीत तमिळ आणि तेलगु भाषांमध्येही रिलीज केला जाणार आहे. ‘पद्मावत’ आयमॅक्स थ्रीडीमध्ये रिलीज होणारा पहिला भारतीय सिनेमा आहे. 


चार मोठ्या राज्यात बंदी


सुरूवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेला पद्मावत हा चित्रपटाला सेंसर बोर्डातही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. पद्मावत २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि मध्य प्रदेश या चार राज्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार नव्हते.