Suriya News : दाक्षिणात्य अभिनेता सूर्या गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'कुंगवा' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो सतत या चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. या चित्रपटात सूर्यासोबत बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, सूर्यानं त्याच्या इंडस्ट्रीतल्या स्ट्रगलच्या काळातील त्याचे दिवस आठवले आहेत. त्यानं सांगितलं की त्याची आई 25 हजार रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी असमर्थ ठरली होती. त्यानं सांगितलं की त्यानं 1200 रुपये महिन्यावर कपड्याच्या कंपनीत काम केलं होतं. त्याशिवाय आणखी कोणत्या गोष्टी आहेत त्याविषयी देखील त्यानं यावेळी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत सूर्यानं सांगितलं की ही खूप मोठी गोष्ट आहे. मला फक्त चाहत्यांना हे सांगायचं आहे की मला कसं वाटतं आणि माझ्यासाठी त्यांचं काय महत्त्व आहे. मी एका कपड्यांच्या इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो आणि पहिले 15 दिवस मी ट्रेनी होतो. त्या 15 दिवसांसाठी माझा पगार 750 रुपये होता. अभिनेत्यानं पुढे सांगितलं की पहिले सहा महिने त्यांना माहित नव्हतं की मी एक अभिनेत्याचा मुलगा आहे. तेव्हा माझा महिन्याचा पगार हा 1200 रुपये होता. मी जवळपास तीन वर्ष काम केलं. तोपर्यंत माझा पगार हा 8 हजार रुपये झाला होता. 


आईनं घेतलं 25 हजार रुपयांचं कर्ज


सूर्यानं पुढे सांगितलं की "घरात अशी स्थिती होती. एक दिवस, मला नाश्ता वाढत असताना माझ्या आईनं मला सांगितलं की मी 25,000 रुपये उधार घेतले होते आणि तुझ्या वडिलांना माहित नव्हतं. मला खूप आश्चर्य झालं. माझं असं झालं आई तू काय बोलतेस? वडील एक अभिनेता आहेत. तू 25,000 हजार रुपये उधारीवर घेऊ शकत नाही. आपण जी बचत केली होती त्याचं काय झालं? आपला बॅंक बॅलेन्स किती आहे? त्यावर आईनं सांगितलं की तो कधीच एक लाख रुपयांपेक्षा जास्त राहिला नाही." 


वडिलांविषयी बोलताना सूर्यानं सांगितलं की "माझे वडील हे नेहमीच असंच करायचे. ते अजूनही त्यांचा पगार मागत नाहीत. ते अजूनही ही प्रतीक्षा करत असतात की निर्माते स्वत: त्यांचे पैसे समोरून येऊन देत नाहीत. हा तो काळ देखील होता जेव्हा माझ्या वडिलांकडे जास्त चित्रपट नव्हते. जवळपास 10 महिन्यांचा गॅप होता. जेव्हा मी माझ्या आईला 25 हजार रुपयांसारख्या छोटी रक्कम देण्यासाठी करत असलेला संघर्ष पाहिला, तेव्हा मला वाईट वाटलं. मी स्वत: विचार केला की मी काय करतोय?"


हेही वाचा : ऐश्वर्याच्या माहेरी का नाही गेला अभिषेक बच्चन? सत्य समोर येताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक


पुढे सूर्या म्हणाला, अभिनेत्याचा मुलगा असल्यानं त्याला अनेकदा चित्रपटासाठी ऑफर मिळायच्या. पण मनी रत्नम यांच्या प्रोडक्शन टीमनं जेव्हा चित्रपटासाठी सतत विचारणा केली. तेव्हा फक्त आईनं घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी होकार दिला. सूर्या याविषयी सांगत म्हणाला, "मी कधीच विचार केला नव्हता की मी चित्रपटसृष्टीत काम करेन. मला कधीच कॅमेऱ्यासमोर यायचं नव्हतं आणि अभिनेता होण्याचं स्वप्न देखील नव्हतं. आईनं घेतलेलं 25 हजार रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी कॅमेऱ्यासमोर आलो आणि म्हणालो, तुझं कर्ज आता फेडलं, तुला आता कोणतीही चिंता करण्याची गरज नाही आणि अशा प्रकारे मी माझ्या करिअरची सुरुवात केली आणि असा मी सूर्या झालो."