नवी दिल्ली : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या भावावर शनिवारी भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. तीन अज्ञात व्यक्तींनी सुशांतच्या भावावर गोळी झाडली आहे. गोळीबार करण्यात आलेल्या सुशांतच्या भावाचे नाव राजकुमार सिंह असं आहे. राजकुमारसह त्याचा कर्मचारी अमीर हसनला देखील गोळी मारण्यात आली आहे. दोघांवर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या पोलीस त्या अज्ञात गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमांद्वारे अज्ञातांचा शोध घेत आहेत. अज्ञातांनी सुशांतच्या भावाला आणि त्याच्या कर्मचाऱ्याला गोळी का मारली याचे कारण स्पष्ट झालेले नाही. तीन अज्ञात दुचाकी स्वारांनी हे कृत्य केलं आहे. 


राजकुमारचा मधेपुरा याठिकाणी बाईकचं शोरूम आहे. राजकुमार आणि त्याचा कर्मचारी घरातून शोरूमच्या मार्गाने जात असताना दोघांवर गोळीबार करण्यात आला. अशी माहिती राजकुमार सिंहने दिली आहे. दुचाकीवर स्वार असलेल्या इसमांनी हेलमेट आतल्यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही असं देखील राजकुमारने पोलिसांना सांगितलं. 



दरम्यान 14 जून 2020 रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याच्या वांद्रेयेथील राहत्या घरी गळफास घेवून या जगाचा अखेरचा निरोप घेतला. त्याच्या मृत्यूनंतर सुशांतची हत्या की आत्महत्या? अशी चर्चा सर्वत्र होत होती. शिवाय सोशल मीडियावर देखील त्याच्या चाहत्यांनी हा मुद्दा उचलून घरला होता.