मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वांद्रे येथील त्याच्या राहत्या घरी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. किस देश मे है मेरा दिल मालिकेतून त्याने कलाविश्वात पदापर्ण केलं, त्यानंतर पवित्र रिश्ता मालिकेतून तो प्रसिद्ध झोतात आला. काय पो चे चित्रपटामधून त्याने बॉलिवूड इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने शुद्ध देसी रोमान्स, पीके, एमएस धोनी, छिछोरे यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने जबरदस्त भूमिका साकारल्या होत्या.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जरा नच के दिखा, झलक दिख ला जा रिऍलिटी शोमध्येही त्याने सहभाग घेतला होता.


सुशांतने नैराश्यात असल्याची माहिती मिळत आहे. त्यातूनच करियरच्या टॉपला असताना त्याने असं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे. सुशांतची अशी अकाली एक्झिट सर्वांसाठीच धक्कादायक आहे. 


21 जानेवारी 1986मध्ये पाटण्यात त्याचा जन्म झाला होता. त्याने इंजिनिअरिंगची पदवीही घेतली होती.