सारासोबत सुशांतने पहिल्यांदा घेतला ड्रग्सचा हेवी डोस, रियाचा NCB समोर दावा
अतिशय धक्कादायक माहिती
मुंबई : सुशांत सिंह राजपूतच्या ड्रग्स प्रकरणात अटकेत असलेल्या रिया चक्रवर्तीने धक्कादायक खुलासा केली आहे. अटकेच्या अगोदर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) च्या चौकशीत रियाने सुशांतचं घर सोडण्यामागचं कारण सांगितलं आहे. या चौकशीत रियाने सांगितलं की, ८जून रोजी सुशांतचं घर तिने का सोडलं.
एनसीबीला दिलेल्या स्टेटमेंटमध्ये रियाने सांगितलं की, सुशांत एक ड्रग एडिक्ट झाला होता. तो यामधून बाहेर पडू शकत नव्हता. याच कारणामुळे तिने सुशांतचं घर सोडलं. या दरम्यान लॉकडाऊन आणि सुशांतवर लावण्यात आलेल्या मीटूच्या आरोपावरून तिच्या लक्षात आलं हों की, ती सुशांतसोबत राहिली तर तिचं करिअर खराब होऊ शकतं. यामुळे सुशांतला सोडणंच तिला योग्य वाटलं.
आपल्या स्टेटमेंटमध्ये रियाने सुशांत आणि साराच्या ड्रग्स घेण्याबाबतचा खुलासा केला आहे. केदारनाथ सिनेमानंतर सुशांतच्या ड्रग्स घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली. रियाच्या माहितीनुसार, सुशांत या अगोदरपासून ड्रग्स घेत होता. असं नाही की केदारनाथ सिनेमांतच त्याने सुरूवात केली पण प्रमाण मात्र यावेळीच वाढलं.
सुशांत मुंबईत आला तेव्हापासूनच त्याचा सर्कल हा सुपर पार्टी कल्चरचा होता. तेव्हापासूनच ड्रग्स घ्यायला सुरूवात झाली होती. पण तो ड्रग्स एडिक्टेड नव्हता. रियाने सांगितलं की, सुशांत क्युरेटेड मरिजुआनाचे १० ते २० डोस घेत असे. तो पूर्णपणे यावर अवलंबून होता. मीटू आरोपानंतर तो अधिक ड्रग्सचं सेवन करू लागला. आणि लाकडाऊनमध्ये तर तो ड्रग एडिक्ट झाला.