आज Sushant Singh Rajput ला गमावून तीन वर्षे उलटली; अभिनेत्याच्या 50 ड्रीम बकेट लिस्टमधून `या` इच्छा अपूर्णच
Sushant Singh Rajput death anniversary : सुशांत सिंग राजपूतचा आज (14 जून 2023) तिसरा स्मृतीदिन असून सुशांतच्या मृत्यूला तीन वर्ष पूर्ण झाली आहे. मात्र अजूनही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.
Sushant Singh Rajput death News In Marathi : 14 जून 2020 रोजी सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput) मुंबईतील वांद्रे येथी भाड्याच्या फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आला होता. त्यावेळी अभिनेत्याचा मृत्यू आत्महत्या असल्याचे घोषित करण्यात आले. आज सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येला तीन वर्ष पूर्ण झाली तरीही त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे. सुशांत सिंग राजपूतने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली पण त्याच्या काही इच्छा आणि स्वप्ने अपूर्ण राहिली. सुशांतच्या आकस्मित निधनाने त्याची 37 स्वप्ने अपूर्ण राहिली. स्वप्ने जी त्यांच्या 50 ड्रीम बकेट लिस्टचा एक भाग होती.
सुशांतची तिसरी पुण्यतिथी
दिलदार व्यक्तिमत्त्व असलेल्या सुशांतने (Sushant Singh Rajput) आत्महत्येचा टोकाचा निर्णय का घेतला? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मृत्युपूर्वी सुशांतला कशाची चिंता भेडसावत होती असा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे. मृत्यूआधूी सुशांत नैराळश्येच्या गर्तेत होता. तो नेमक्या कोणत्या कारणांमुळे निराश झाला होता? त्याच्या नैराश्याला नेमकं कोण कारणीभूत होतं असा ही प्रश्न आजही त्याच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या चाहत्यांना पडलेला आहे. सुशांतसारखा आत्मविश्वासू, हुशार माणूस असे पाऊल कसं काय उचलू शकतो. सुशांतला त्याची 50 स्वप्ने पूर्ण करायची होती, ज्यासाठी तिने 'बकेट लिस्ट' तयार केली होती. सुशांत सिंग राजपूत त्याच्या केवळ 13 इच्छा पूर्ण करू शकला. त्यांची 37 स्वप्ने पूर्ण करायची राहूनच गेली.
सुशांतच्या मृत्यूने त्याची अनेक स्वप्ने आणि आकांक्षा अपूर्ण राहिल्या. ते पूर्ण करण्यासाठी अभिनेत्याने कोणती योजना आखली होती हे कोणालाही माहिती नाही. अभिनेत्याच्या निधनामुळे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. सुशांतला फक्त 13 स्वप्ने पूर्ण करता आली. उर्वरित 37 अपूर्ण राहिली. अभिनेत्याने एकदा ती स्वप्ने काय आहेत याची यादी शेअर केली होती, ज्याचे नाव होते 50 ड्रीम्स...
सुशांत सिंग राजपूतच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा
1. सुशांत सिंग राजपूतची इच्छा होती वैमानिक बनण्याची.
2. अर्नमन ट्रायल लॉन्चसाठी तयारी करायची होती.
3. डाव्या हाताने क्रिकेट खेळायचं होते.
4. सुशांतला मोर्स कोड शिकायचे होते.
५. मुलांना स्पेसबद्दस माहिती द्यायची होती.
6. टेनिसच्या चॅम्पियनशी सामना खेळला होता.
7. सुशांतला फोर क्लॅप पुशअप करायला आवडले असते.
8. सुशांतला डबल स्लिटचा प्रयोग करण्याची इच्छा होती.
9. सुशांतला हजारो रुपये लावण्याची इच्छा होती.
10. सुशांतला दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग किंवा कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये एक रात्र घालवावी अशी इच्छा होती.
11. कैलास पर्वतावर जाऊन सुशांतला ध्यानाला बसायचे होते.
12. सुशांतला एक पुस्तकही लिहायचे होतं.
13. सुशांतला डिस्नेलँडला भेट द्यायची इच्छा होती.
14. सुशांतला घोड्याचा सांभाळ करण्याची इच्छा होती.
15. खेड्यात जाऊन शेती करायची होती.
16. सुशांतला स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर एक माहितीपट बनवायचा होता.
17. सुशांतने आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
18. ब्राझिलियन डान्स आणि मार्शल आर्ट शिकण्याचे सुशांतचे स्वप्न होते.
19. रेल्वेने परदेशात जाण्याचे सुशांतचे स्वप्न होते.
20. नासामधील 100 मुलांना कार्यशाळेचे प्रशिक्षण देण्याचे सुशांतचे स्वप्न होते.