मुंबई : केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक जण पुढे येत आहे. देशभरातून केरळला मदतीचा ओघ सुरु आहे. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. पण अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपल्या एका फॅनच्या सांगण्यावरुन केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी 1 कोटींची मदत केली आहे. सुशांतने पैसे ट्रान्सफर केल्याचा स्क्रीन शॉट देखील इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.



चाहत्याचे मानले आभार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांत सिंह राजपूतने म्हटलं की, माझा मित्र शुभम रंजन. जसं की तुला वचन दिलं होतं ते पूर्ण केलं आहे. तु मला हे करण्यासाठी प्रेरणा दिली यासाठी मला तुझा अभिमान आहे. तु हे तेव्हा केलं जेव्हा याची खरच गरज होती. खूप सारं प्रेम'



मदतीचं आवाहन


केरळमध्ये पुरामुळे अनेक जण बेघर झाले आहेत. 450 हून अधिक जणांनी आपले प्राण गमावले आहेत. याआधी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, दुलकर रहमान आणि जॅकलिन फर्नांडिस यांनी देखील केरळसाठी मदत केली आहे. अमिताभ यांनी ट्विट करुन मदत करण्याचं आवाहन केलं आहे.


जॅकलीनकडून मदत


जॅकलिनने केरळमध्ये मदत कार्य करणाऱ्या एनजीओ हॅबीटेट फॉर ह्यूमॅनिटी इंडियाला 5 लाखांची मदत केली आहे. तिने म्हटलं की, "केरळमध्ये झालेल्या स्थितीमुळे ती खूप दु:खी आहे.'