ज्या फ्लॅटमध्ये Sushant Singh Rajput चा मृत्यू झाला तिथे भाडेकरु का रहायला येईनात? घर मालकानं ठेवली `ही` अट
Sushant Singh Rajput चं हे घर भाड्यावर जात नसताना, मालकानं का ठेवली इतकी मोठी अट, जाणून बसेल धक्का
Sushant Singh Rajput Flat Has Not Found New Tenant : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (Sushanth Singh Rajput) निधनाला दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. तरी देखील त्याच्या संबंधित अनेक चर्चा आजही सुरु असतात. 14 जून 2020 रोजी सुशांतनं मुंबईतील राहत्या घरात आत्महत्या केली. यानंतर इंडस्ट्रीत एकच शोककळा पसरली होती. त्यानंतर सुशांत राहत असलेलं घर भाडेतत्वावर घेण्यास कोणी तयार नसल्याची बातमी समोर आली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून हा फ्लॅट रिकामी आहे. दरम्यान, इतकं होऊनही घर मालकानं एक अट ठेवली आहे. (Sushant Singh Rajput Death)
घराच्या ब्रोकरनं ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत घर भाड्याने द्यायचे आहे. घराचे भाडं 5 लाख रुपये असल्याचे सांगितले. घराचा मालक NRI आहे. या सगळ्यात घर मालकानं एक अट ठेवली आहे. (Sushant Singh Rajput Mumbai House) ती म्हणजे, त्याला हे घर कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीला भाड्यावर द्यायचे नाही तर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला द्यायचे आहे. त्याचे म्हणणे आहे की त्याला हे घर कोणत्या ही सेलिब्रिटीला द्यायचे नाही. मग तो कितीही मोठा सेलिब्रिटी असू दे. फक्त आणि फक्त कॉर्पोरेट सेक्टर मधल्या व्यक्तीला द्यायचे आहे. (Sushanth Singh Rajput Mumbai Home)
सुशांतच्या घराचा व्हिडीओ पाहा
हेही वाचा : Rashmika Mandanna ला कन्नड चित्रपटसृष्टीनं दाखवला बाहेरचा रस्ता? जाणून घ्या सत्य
सुशांत ज्या फ्लॅटमध्ये राहत होता तो 4BHK असून सी फेसिंग आहे. हे घर कार्टर रोड, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे आहे. या घराचे दरमहा भाडे हे 5 लाख रुपये आहे. दरम्यान, ब्रोकरनं घराचा व्हिडीओ शेअर करत त्याचा फोन नंबर देखील दिला आहे. सुशांतने डिसेंबर 2019 पासून सुमारे ₹4.5 लाख दर महा भाड्यावर हा फ्लॅट घेतला होता. कोरोना काळात सुशांत त्याच्यासोबत त्याचे काही मित्र आणि गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती देखील त्याच्यासोबत राहत होते.