मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्यावर आज दुपारी ३ वाजता विलेपार्ल्याच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. सुशांत सिंह राजपूतचे कुटुंबिय आज मुंबईत दाखल झाले आहेत. ३४ वर्षीय मुलाच्या आत्महत्येची घटना सुशांत सिंह राजपूतचे वडिल पचवू शकले नाहीत. या घटनेने त्यांच्यावर खूप मोठा आघात केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांत सिंह राजपूतच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये देखील श्वास घुसमटल्यामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आज सोमवारी अभिनेता सुशांत सिंह राजपूतवर अंत्यसंस्कार होणार आहेत. हे अंत्यसंस्कार मुंबईत होणार असून त्याच्या कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित राहणार आहे. 


सुशांतचे पार्थिव बिहारला नेण्याची परवानगी नाकारली आहे. त्यामुळे त्याचे कुटुंबिय आज १२ पर्यंत मुंबईत पोहोचणार आहे. सुशांत सिंहचं पार्थिव रविवारी रात्री कुपर रूग्णालयात ठेवण्यात आलं. सुशांत सिंह राजपूत ५ ते ६ महिन्यांपासून मनोचिकित्सकाकडून नैराश्यावर उपचार घेत होता. शनिवारी रात्री त्याला अधिक त्रास होऊ लागला. रविवारी त्याने राहत्या घरी हिरव्या रंगाच्या कुर्ताने गळफास लावून घेतल्याचं प्राथमिक अंदाजात स्पष्ट झालं. 



सुशांत सिंहची बहिण रविवारीच मुंबईत दाखल झाली होती. सुशांत सिंह गेल्या सहा महिन्यांपासून नैराश्येत होता अशी माहिती मित्राने दिली असून तसे कागदपत्र घरात सापले आहेत.