Sushant Singh Rajput Flat On Rent: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचं अडीच वर्षे उलटून गेली तर गूढ कायम आहे. असं असताना सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तो फ्लॅटची जोरदार चर्चा रंगली आहे. सुशांतनं (Sushant Singh Rajput) हा फ्लॅट तीन वर्षांसाठी भाड्यावर घेतला होता. या प्लॅटमध्ये त्याच्यासोबत रिया चक्रवर्ती (Rhea Chakravarthy), सिद्धार्थ पिठाणी (Siddharth Pithani) आणि मदतनीस नीरज आणि केशव राहात होते. सुशांतचा याच प्लॅटमध्ये 14 जून 2020 रोजी लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. पोलीस तपासात सुशांतने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं आहे. तर त्याच्या कुटुंबीयांनी आणि चाहत्यांनी सुशांतची हत्या (Sushant Suicide) केल्याचा आरोप केला होता. तपासासाठी हा फ्लॅट रिकामी करण्यात आला होता. 2020 पासून आतापर्यंत हा फ्लॅट जैसे थेच होता. आता या फ्लॅटमध्ये नवा भाडोत्री राहण्यास येणार आहे. या प्लॅटचा मालक विदेशात राहात असून भाडोत्रीची शोधाशोध सुरु होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असंच म्हणावं लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांत सिंह राजपूत राहात असलेला प्लॅट मुंबईच्या वांद्रे स्थित कार्टररोडवर आहे. हा फ्लॅट 4BHK असून सी फेसिंग आहे. मात्र या फ्लॅटमध्ये आत्महत्या केल्याने कोणीही भाडोत्री मिळत नव्हता. मीडिया रिपोर्टनुसार, प्लॅटच्या मालकाकडे एका भाडोत्र्याने फ्लॅटसाठी विचारणा केली आहे. दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच डील फायनल होणार आहे. हायप्रोफाईल लोकवस्ती असल्याने या प्लॅटचे भाडेही जास्त आहे. या प्लॅटचं भाडं वाचाल तर तुम्हीही चक्रावून जाल. या प्लॅटसाठी भाड्याच्या रुपाने दर महिना 5 लाख रुपये मोजावे लागणार आहेत.


9 डिसेंबर 2022 रोजी रियल इस्टेट ब्रोकर रफीक मर्चेंटनं सोशल मीडियावर या फ्लॅटचा व्हिडीओ पोस्ट केला होता. त्याचबरोबर पोस्टमध्ये लिहिलं होतं की, सी फेसिंग फ्लॅट 5 लाख रुपये महिना भाड्यावर उपलब्ध आहे. सुशांतने डिसेंबर 2019 पासून सुमारे 4.5 लाख दर महिना भाड्यावर हा फ्लॅट घेतला होता.



एका वेबसाईटशी बोलताना रफीक मर्चंटनं सांगितलं होतं की, फ्लॅटचे मालक हा फ्लॅट फिल्म स्टार्संना देऊ इच्छित नाही. हा फ्लॅट कॉर्पोरेट पर्सनला देण्याची इच्छा मालकाने व्यक्त केली आहे.