मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येच्या वृत्ताने सर्वांनाच सुन्न करुन सोडले आहे. त्याच्या कुटुंबीयांनाही या गोष्टीचा खूप मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच तो आपल्या कुटुंबीयांशी बोलला होता. त्यावेळी त्याने घरच्यांना आपण नोव्हेंबर महिन्यात लग्न करणार असल्याचे सांगितले होते. मुंबईत त्याचे लग्न होणार होते. मात्र, त्यावेळी सुशांतने आम्हाला मुलीचे नाव सांगितले नव्हते, अशी माहिती त्याच्या भावाने दिली. सुशांत अभिनेत्री रेहा चक्रवर्ती हिला डेट करत असल्याची चर्चा होती. मात्र, या दोघांनी आपल्या नात्याविषयी जाहीरपणे काहीही सांगितले नव्हते. त्यामुळे सुशांतच्या आयुष्यातील ही मुलगी नेमकी कोण होती, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

...म्हणून सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली का? धक्कादायक खुलासा


सुशांतच्या मृत्यूच्या बातमीने त्याचे संपूर्ण कुटुंब हादरले आहे. सुशांतचे कुटुंबीय पाटणा येथे राहतात. सुशांतच्या वडिलांना दुपारी फोनवरून ही बातमी सांगण्यात आली. त्यानंतर सुशांतच्या वडिलांना प्रचंड धक्का बसला. त्यांची प्रकृती सध्या खालावली आहे. 


...म्हणून सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली का? धक्कादायक खुलासा


आज संध्याकाळच्या सुमारास सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह कूपर रुग्णालयात नेण्यात आला. याठिकाणी त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला होता. ‘इंडिया टीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपासून सुशांत नैराश्यामध्ये असल्याचे म्हटले जाते. त्याची हिंदुजा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट सुरु होती. गेल्या तीन दिवसांपासून सुशांतला बरे नसल्याचे त्याच्या घरात काम करणाऱ्या व्यक्तीने सांगितले.