Sushant Suicide Case: रियाने ८ हार्ड डिस्क नष्ट करुन घेतल्या- सिद्धार्थ पिठाणी
मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीवेळीही सिद्धार्थ पिठाणीने ही माहिती दिली होती.
मुंबई: अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यूप्रकरणी केलेल्या चौकशीदरम्यान सिद्धार्थ पिठाणीने केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला CBI एक महत्त्वाची माहिती दिली आहे. सुशांतसोबत भांडण झाल्यानंतर रियाने घर सोडण्यापूर्वी ८ हार्ड डिस्क नष्ट केल्या होत्या. यामध्ये नक्की काय होते, हे मला माहिती नाही. मात्र, या हार्डडिस्क नष्ट करण्यासाठी सुशांतच्या घरी एका आयटी प्रोफेशनला बोलावण्यात आले होते. हार्ड डिस्कवरचा सगळा डेटा नष्ट करताना दीपेश सावंत आणि कुक नीरजही त्याठिकाणी उपस्थित असल्याचे सिद्धार्थ पिठाणी याने सीबीआयला सांगितले.
कंगनाचा धक्कादायक गौप्यस्फोट; ते माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळायचे...
विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीवेळीही सिद्धार्थ पिठाणीने ही माहिती दिली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र, सीबीआयच्यादृष्टीने हा महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. हार्ड डिस्कमध्ये सुशांत आणि रियाच्या कुटुंबाच्या परदेश दौऱ्याचे फोटो यामध्ये असल्याचा संशय आहे. तसेच दोघांच्या कंपन्यांचे महत्त्वाचे कागदपत्रही हार्ड डिस्कमध्ये होते, अशी शक्यता आहे.
रियाने माझ्या मुलावर विषप्रयोग केला; सुशांत राजपूतच्या वडिलांचा आरोप
तत्पूर्वी सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी रियाने माझ्या मुलावर विषप्रयोग केल्याचा आरोप केला. रिया बऱ्याचा काळापासून माझ्या मुलाला विष देत होती. रियाने सुशांतचा Sushant Singh Rajput खून केला आहे. त्यामुळे तपासयंत्रणांनी रेहा व तिच्या साथीदारांना पकडून त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी सुशांतच्या वडिलांनी केली.