कंगनाचा धक्कादायक गौप्यस्फोट; ते माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळायचे...

अनेकांना धक्काच बसत आहे. 

Updated: Aug 27, 2020, 10:47 AM IST
कंगनाचा धक्कादायक गौप्यस्फोट; ते माझ्या ड्रिंकमध्ये काहीतरी मिसळायचे...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या वक्तव्यांसाठी कायमच चर्चेचा विषय ठरत आहे. त्यातच अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी तर कंगनानं घराणेशाहीच्या मुद्द्यावर तिची ठाम मतं सर्वांपुढं डली. सोशल मीडियावर तिनं सातत्यानं कलाविश्वातील गटबाजी आणि घराणेशाहीच्या मुद्द्यावर आवाज उठवला. इतकंच नव्हे, तर आता तिनं याच कलाविश्वाचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला आहे. ज्यामुळं धक्काच बसत आहे. 
सुशांत सिंह राजपूत SUSHANT SINGH RAJPUT आत्महत्या प्रकरणातसुरु असणाऱ्या तपासादरम्यान आता अंमली पदार्थ अर्थातच ड्रग्जचा वापर झाल्याची बाब समोर येत आहे. यामध्येच इंडस्ट्रीमध्ये ड्रग्जचा कशा प्रकारे वापर केला जातो याचा गौप्यस्फोट कंगनानं केला. 

सोशल मीडियाचा आधार घेत कंगनानं तिच्याच आयुष्याशी संबंधित एक घटना सांगितली. ज्यामुळं अनेकांना धक्काच बसत आहे. शिवाय बी- टाऊनमधील एका गटावकरही तिनं टीका केली आहे. नार्कोटीक्स टेस्ट झाल्यास अनेक कलाकार जेलमध्ये जातील असा खळबळजनक दावाही तिनं केला. 

अल्पवयीन असताना दिलेले ड्रग्ज... 

ट्विट करत कंगानानं लिहिलं, 'जेव्हा मी अल्पवयीन होते तेव्हा माझे मेंटर इतके भीतीदायक झाले होते की ते माझ्या ड्रिंकमध्ये ड्रग्ज मिसळायचे. म्हणजे मी पोलिसांनाकडे जाणार नाही. जेव्हा मी यशस्वी झाले आणि अनेक पार्ट्यांमध्ये जाऊ लागले तेव्हा ड्रग्ज, अय्याशी आणि माफिया जगताच्या या भयावह वास्तवाशी माझा सामना झाला. 

इतक्यावरच न थांबता ती पुढं म्हणाली... 

नेहमीच बॉलिवूडमधील प्रस्थापितांवर निशाणा साधणाऱ्या कंगनानं आणखी एक ट्विट करत म्हटलं, 'जर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो बॉलिवूडमध्ये आलं तर, अनेक आघाडीचे कलाकार कारावासाची शिक्षा भोगत असतील. रक्त तपासणी झाल्यास यातून बरेच खुलासे होतील. मी आशा करते की, स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बॉलिवूडमधील ही घाणही स्वच्छ होईल'. 

आपण नार्कोटिक्स खात्याची मदत करण्यासाठी तयार असल्याचं म्हणत कंगनानं यामधील धोका पाहता केंद्राकडून संरक्षणाची मागणी केली आहे. आपण आपल्या करिअरलाच नव्हे, तर स्वत:लाही धोक्यात टाकल्याची भीती तिनं व्यक्त केली. 

 

कंगनानं ही मागणी करताच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनीही हा मुद्दा उचलून धरला. तिला सुरक्षा देण्याची मागणी अनेक चाहत्यांनी केली. ज्यामुळं #कंगना_राणावत_को_सुरक्षा_दो असा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करु लागला होता.