पाटणा: रिया चक्रवर्ती Rhea Chakraborty ही बऱ्याच काळापासून माझ्या मुलाला विष पाजत असल्याचा आरोप सुशांतसिंह राजपूतचे वडील के.के. सिंह यांनी केला आहे. ते गुरुवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी के.के. सिंह यांनी म्हटले की, रियाने सुशांतचा Sushant Singh Rajput खून केला आहे. त्यामुळे तपासयंत्रणांनी रिया व तिच्या साथीदारांना पकडून त्यांना शिक्षा करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सुशांतसिंहप्रकरणी 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो'कडूनही गुन्हा दाखल
सध्या केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून CBI मुंबईत सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे. गेल्या काही दिवसांत रिया चक्रवर्ती, सिद्धार्थ पिठाणी यांच्यासह अनेकांची चौकशी करण्यात आली आहे. याशिवाय, सीबीआयने सुशांतच्या घरी क्राईम सीन पुन्हा रिक्रिएट करून सर्व बाबी तपासल्या होत्या. यावेळी तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या होत्या.
#WATCH Rhea Chakraborty was giving poison to my son, Sushant from a long time, she is his murderer. The investigating agency must arrest her and her associates: KK Singh, #SushantSinghRajput's father pic.twitter.com/EsVpAUlZMt
— ANI (@ANI) August 27, 2020
दिशा सालियान आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून झाली 'ही' चूक
कालच रिया चक्रवर्ती अंमली पदार्थ पुरवणाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आली होती. एका ड्रग डिलरसोबतचे तिचे व्हॉटसएप चॅटस समोर आले होते. यामध्ये रिया गौरवला एमडी म्हणजेच Methylenedioxymethamphetamine या अतिशय स्ट्राँग ड्रग्जविषयी विचारणा करताना दिसत आहे. याशिवाय, रिया सुशांतच्या चहा, कॉफी आणि पाण्यातही अंमली पदार्थ मिसळत असल्याची माहिती समोर आली होती.