मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलीस प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. नुकताच समोर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टच्या माध्यमातून असं समोर येत आहे की, त्याचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे झाला आहे. अंतिम पोस्टमॉर्टम अहवालात पोलिसांना माहिती मिळाली की सुशांतचा मृत्यू फाशीमुळे झाला. ५ डॉक्टरांच्या टीमने या पोस्टमार्टम रिपोर्टचे विश्लेषण केले. या रिपोर्टनंतर पोलिसांचे डोळे व्हिसेरा रिपोर्टकडे लागले होते. आता ते रिपोर्ट देखील समोर आले आहेत. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, सुशांत सिंगच्या शरीरावर संशयास्पद रसायने किंवा विष सापडलेले नाही. सुशांतच्या पोस्टमार्टमनंतर व्हिसेरा जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुशांतसिंग राजपूत याने आत्महत्या केल्यानंतर आता त्यामागची कारणे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. या साऱ्यामध्येच मुंबई पोलिसांनी सुशांतच्या आत्महत्येचं खरं कारण शोधण्यासाठीचा तपासही सुरु केला. ज्या धर्तीवर आतापर्यंत जवळपास २७ जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.


दरम्यान 'दिल बेचरा' चित्रपटातील अभिनेत्री संजना सांघीची देखील चौकशी करण्यात आली आहे. मंगळवारी संजना चौकशीसाठी वांद्रे येथील पोलीस स्थानकात पोहोचली दाखल झली होती. 


याआधी यशराज फिल्म्सचे कास्टिंग दिग्दर्शकांची देखील चौकशी करण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूतने अगदी कमी कालावधीत आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर केलं. पण १४ जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून त्याने त्याचा प्रवास संपवला.