सुष्मिता सेन आणि ललित मोदी यांच्यात श्रीमंतीच्याबाबतीत पुढे कोण? जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. सुष्मिता ही ललित मोदी यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी ललित यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपविषयी माहिती दिली होती. या बातमीने सगळ्यांना धक्काच बसला. अनेकांनी सुष्मिताला 'गोल्ड डीगर' म्हणूनही हिणवलं. यानंतर सुष्मिता आणि ललित मोदी यांची संपत्ती किती? असा प्रश्न अनेकांनी केला. चला तर जाणून घेऊया सुष्मिता आणि ललित मोदी यांच्या एकूण संपत्ती विषयी...
ललित मोदी हे एक व्यावसायिक आहेत. व्यावसायिक दृष्ट्या दारू, सिगरेट आणि पान मसाल्याचे ब्रॅंड आणि काही स्टोर्स, रेस्टॉरंट आणि ट्रॅव्हल कंपन्या देखील ललित मोदी यांच्या आहेत. ललित हे २०१० मध्ये भारत सोडून परदेशात गेले होते. लंडनमध्येच त्यांच एक आलिशान घर आहे. लंडनमधील त्यांचा बंगला हा ७ हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. या बंगल्यात ८ बेडरूम आहेत. या बंगल्यात राहण्यासाठी ललित मोदी हे दर महिन्याला २० लाख रुपये भाडं देतात.
ललित यांच्या व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर ते त्यातून कोट्यवधींची कमाई करतात. भारताव्यतिरिक्त पश्चिम आफ्रिका, दक्षिण-पूर्व आफ्रिका, युरोप, दक्षिण-पूर्व आशिया, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही त्यांचा व्यवसाय आहे. त्यांची एकूण संपत्ती १२ हजार कोटींच्या आसपास आहे.
किती आहे सुष्मिता सेनची एकूण संपत्ती?
मीडिया रिपोर्टनुसार, सुष्मिता वर्षाला ९ कोटी तर महिन्याला ६० लाख रुपये कमावते. सुष्मिताकडे जवळपास १०० कोटींची संपत्ती आहे. सुष्मिता तिच्या दोन्ही मुलींसोबत मुंबईतील वर्सोवा या परिसरात एका आलिशान फ्लॅटमध्ये राहते. तर सुष्मिताच्या कार कलेक्शनबद्दल बीएमडब्ल्यू ७ सीरिज ७३० एलडी आहे. या गाडीची किंमत ही जवळपास १. ४२ कोटी रुपये आहे. याशिवाय बीएमडब्ल्यू एक्स ६ असून तिची किंमत ही १ कोटी रुपये आहे. तर, ८९.९० लाख रुपये किंमत असलेली ऑडी क्यू ७ देखील आहे. सुष्मिता एका चित्रपटासाठी जवळपास ३ ते ४ कोटी रुपये मानधन म्हणून घेते. तर या सगळ्यावरुन हे स्पष्ट होतं की, ललित आणि सुष्मितामध्ये सर्वात जास्त श्रीमंत ललित मोदी आहेत.