मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सुष्मिता सेन उद्योगपती ललित मोदीसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे. सुष्मिताने ललित मोदीसोबत असलेल्या प्रेमाची कबुली सर्वांसमोर दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. नवी सुरुवात केल्यामुळे अनेकांनी सुष्मिताला शुभेच्छा दिल्या, तर काहींनी सुष्मिता आणि नात्याच्या मात्र तिव्र विरोध केला. दरम्यान, ललित मोदी आणि सुष्मिता सेनचे रोमँटिक फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये सुष्मिता सार्डिनियामध्ये आनंद लुटताना दिसली. फोटो शेअर करत सुष्मिताने कॅप्शनमध्ये, 'Sen & the Italian Sun' असं लिहिलं आहे. 



सार्डिनिया हे जगातील सर्वात सुंदर बेटांपैकी एक असल्याचं मानलं जातं. हे ठिकाण पर्यटकांमध्ये देखील प्रचंड लोकप्रिय आहे. सेलेब्सशिवाय अनेक कपल्स इथे व्हेकेशन एन्जॉय कराण्यासाठी जातात. जर तुम्ही देखील समुद्रकिनारा प्रेमी असाल तर तुम्ही एकदा सार्डिनियाला भेट द्या. सार्डिनियाबद्दल खास गोष्टी जाणून घेऊया-


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


- समुद्रकिनाऱ्याला कोणतीही हानी होऊ नये म्हणून पर्यटकांबाबत अनेक नियम आणि कायदे आहेत.
- पर्यटकांची वाढती संख्या पाहता समुद्रकिनाऱ्यावरील नैसर्गिक सौंदर्याचे रक्षण व्हावे यासाठी येथे लोकांचा प्रवेश मर्यादित आहे.
- उन्हाळ्यात, Cala Couticio आणि Cala Brigantina Beach वर एका दिवसात फक्त 60 लोकांना परवानगी आहे. 
- येथे जाण्यासाठी, पर्यटकांना प्रथम त्यांचा ऑनलाइन स्लॉट बुक करावा लागतो, ज्यासाठी त्यांना 3 डॉलर फी म्हणून भरावे लागतात.
- लोक परंपरा हा सार्डिनियन संस्कृतीचा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे. येथे लोक कोणत्याही सणाच्या वेळी त्यांच्या पारंपारिक कपड्यांमध्ये लोकनृत्य करतात. तुम्ही इथे फिरयला जाणार असाल तर येथील लोकनृत्य जरूर पहा.