मुंबई : माजी मिस युनिवर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या अनेक दिवसांपासून १६ वर्ष लहान बॉयफ्रेंडसोबत असलेल्या रिलेशनशिपबाबत चर्चेत आहे. सुष्मिता सेन आणि बॉयफ्रेंड रोहमन शॉलने गुपचूक साखरपुडा केल्याची चर्चा आहे. सुष्मिता सेनने दोन दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला होता. या फोटोसाठी सुष्मिताने रोमॅन्टिक पोस्ट लिहिली असून फोटोत तिच्या हातात ऍन्गेजमेंट रिंगही दिसत आहे. तिने शेअर केलेल्या या फोटोमुळे दोघांनी साखरपुडा केला असल्याची सध्या चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



गेल्या वर्षापासून सुष्मिता सेन रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. इंन्स्टाग्रामवरील या दोघांच्या फोटोमधून त्यांचं रिलेशनशिप, बॉन्डिंग दिसून येतं. सुष्मिता आणि रोहमन सतत एकमेकांसोबतचं फोटो शेयर करत असतात. परंतु आता नुकताच सुष्मिताने शेयर केलेल्या एका फोटोमुळे या दोघांनी साखरपुडा केल्याची माहिती समोर आली आहे. दोघांच्या या फोटोवर अनेक यूजर्स त्यांना साखरपुडा केला का? असा सवालही केला आहे. सुष्मिताच्या हातातील अंगठी आणि तिने लिहिलेली पोस्ट यामागचं रहस्य अद्याप कायम आहे.



सुष्मिताने शेयर केलेला फोटो, अंगठी आणि फोटोवरील रोमॅन्टिक पोस्टबाबत आता सुष्मिता आणि रोहमन हे दोघंच नेमकं उत्तर देऊ शकतील. सुष्मिता आणि रोहन यांची एका फॅशन इव्हेंटदरम्यान ओळख झाली होती. सुष्मिता सेन २०१५ साली 'निरबाक' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता सध्या ती 'हॅप्पी अॅनिव्हर्सरी' या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असल्याची माहिती आहे.