मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने ब्रेकअपच्या बातम्यावर अखेर मौन सोडलंय. सुष्मिता सेनने बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत ब्रेकअप केलं आहे. महत्वाचं म्हणजे सुष्मिता आणि रोहमन यांचा ब्रेकअप खूप आधीच झाला आहे. मात्र आजही त्यांच्याच प्रेम बाकी आहे. 


सुष्मिता सेनने ब्रेकअप केलं कन्फर्म 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मिता सेनने अनेक चर्चांना पूर्णविराम देत फोटो शेअर केला आहे. रोहमन शॉलसोबतचा फोटो शेअर केलाय. फोटोत दोघंही सेल्फी पोझ देत आहेत. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, मैत्रीतून आमचं नातं सुरू झालं, आम्ही चांगले मित्र झालो, रिलेशन खूप आधीच संपलं... मात्र प्रेम बाकी आहे. 



सुष्मिता सेनने आपल्या पोस्टमध्ये #nomorespeculations #liveandletlive #cherishedmemories #gratitude #love #friendship अशा हॅशटॅगचा वापर केला आहे.


सुष्मिता सेनच्या या पोस्टमधून कळतंय की रोहमन आणि सुष्मिता खूप चांगले मित्र आहेत.


सुष्मिता सेन आणि रोहमन शॉलची जोडी चाहत्यांना खूप आवडली होती. दोघांचे लग्न झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. सुष्मिताच्या दोन मुली आणि कुटुंबासह रोहमनची खूप चांगली बॉन्डिंग होती. 


पण लोकप्रिय जोडीला कोणाचे तरी नजर लागली. सुष्मिता आणि रोहमन आता एकत्र नाहीत हे जाणून अभिनेत्रीचे चाहते नाराज झाले आहेत. त्यांच्या ब्रेकअपमागे काय आहे?


रोहमन आणि सुष्मिताची भेट सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली. रोहमनने सर्वप्रथम अभिनेत्रीला इन्स्टावर मेसेज केला होता. यानंतर दोघे एका फॅशन शोमध्ये भेटले.


रोहमनसोबतच्या पहिल्या भेटीतच सुष्मिता सेन प्रभावित झाली होती. दोघे लगेच जोडले गेले. सुष्मिता सेनने याआधी विक्रम भट्ट, वसीम अक्रम, रणदीप हुड्डा, रितिक भसीन, मुदस्सर अजीज यांना डेट केलं आहे.