सुष्मिता सेन `गोल्ड डिगर`? भाऊ राजीवने नेटकऱ्यांना दिलं सडेतोड उत्तर
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असून गेल्या काही दिवसांपासून ती तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. सुष्मिता ही ललित मोदी यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. काही दिवसांपूर्वी ललित यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपविषयी माहिती दिली होती. या बातमीने सगळ्यांना धक्काच बसला. अनेकांनी सुष्मिताला 'गोल्ड डीगर' म्हणूनही हिणवलं. यावर सुष्मिताचा भाऊ राजीव सेनने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडीयावर नेटकऱ्यांनी बहिण सुष्मितावर होणाऱ्या ट्रोलिंगवर राजीवने सडेतोड उत्तर दिलं आहे. "जेव्हापासून श्री. मोदी आणि माझ्या बहिणीचे फोटो समोर आलेत तेव्हापासून अनेक नकारात्मक प्रतिक्रियांना सुष्मिताला सामोरं जावं लागतंय. मला फक्त इतकचं बोलायचं आहे की, माझी बहिण ही सेल्फ मेड वूमन आहे. आतापर्यत तिनं जी ओळख निर्माण केली आहे ती स्वत: च्या मेहनतीने मिळवली आहे.
त्यामुळे अनेकदा ट्रोलर्स कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता प्रतिक्रिया देऊन मोकळे होतात. या सगळ्या प्रकरणावर माझ्या बहिणीला काय म्हणायचं होतं हे तिने सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून मी सुष्मिताच्या बाबतीत काय होतं आहे याचा अंदाज घेतला आहे. वास्तविक तिच्याबद्दल जे काही बोललं जातं आहे ते वाईट आहे. त्यामुळे मला त्यांना सांगायचं आहे की, तुम्हाला जर पूर्ण सत्य माहिती नाही तर तुम्ही कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्याची घाई करु नका," असं राजीव म्हणाला.
दरम्यान, ललित मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या रिलेशनशिपविषयी सांगितल्यानंतर सगळ्यात आधी प्रतिक्रिया ही राजीवनं दिली होती. एका मुलाखतीत राजीव म्हणाला की, "या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्याआधी मी माझ्या बहिणीशी चर्चा करेन. मला या प्रकरणात काही माहिती नाही. माझ्या बहिणीने अजून यावर प्रतिक्रिया देत हे सत्य असल्याचं म्हटलं नाही, म्हणून मी यावर कोणतीही कमेंट करू शकत नाही."