मुंबई : माजी मिस युनिवर्स सुष्मिता सेन आणि प्रसिद्ध बिझनेसमन ललित मोदी एकमेकांना डेट करत असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीचं दिली होती. या संबंधित फोटो देखील समोर आले होते. यानंतर सोशल मीडियावर दोघांना ट्रोल केले गेले तसेच त्यांच्या नात्यावर टीका करण्यात आली होती. दोघांच्या नात्यावर आता विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात आता उर्फी जावेदने या नात्यावर तिची प्रतिक्रिया दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पॉटबॉयशी बोलताना उर्फी म्हणाली, 'सुष्मिता सेन आधीच खूप श्रीमंत आहे. लोक तिला गोल्ड डिगर का म्हणतात हे मला समजत नाही, असे ती म्हणालीय. ती फक्त तिच्यापेक्षा थोडा श्रीमंत असलेल्या माणसाला डेट करतेय. लोक तिला विनाकारण ट्रोल करतायत, लोभी म्हणतायत हे खूप निराशाजनक असल्याचे तिने म्हटलेय.  


जर एखादा पुरुष तिच्यापेक्षा श्रीमंत स्त्रीला डेटिंग करू लागला तर कोणीही काहीही बोलणार नाही. मग लोक त्याला राक्षस मानणार नाहीत, तर महिलांना लगेच गोल्ड डिगरचे लेबल दिले जाते,असेही तिने सुष्मिताच्या समर्थनार्थ म्हटलं. 


सुष्मिताला पैशांचा लोभी म्हणणाऱ्यांना उर्फी जावेद म्हणाली की, सुष्मिता स्वतःसाठी कमवू शकत नाही. जसे तिच्याकडे जे काही आहे किंवा जे हवे आहे ते विकत घेण्यासाठी तिच्याकडे पैसे नाहीत. महिला नेहमीच सॉफ्ट टार्गेट बनतात, असे तिने म्हटले आहे.  


दरम्यान सुष्मिता सेनला ललित मोदीसोबतच्या नात्यावर ट्रोल केले जात असताना आता विविध स्तरावरून तिला पाठींबा दिला जातोय.