सुष्मिता सेनची ८ महिन्याची भाची `या` गंभीर आजाराशी देतेय झुंज
चारूनं तिच्या व्लॉगमध्ये मुलीच्या आजाराविषयी सांगितले आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनची (Sushmita Sen) वहिनीचे आयुष्य सध्या कठीण टप्प्यातून जात आहे. चारू असोपा (Charu Asopa) आणि राजीव सेन (Rajiv Sen) यांनी घटस्फोट घेत एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. चारु असोपा आणि राजीवची ८ महिन्याची एक मुलगी आहे. ते दोघं विभक्त झाल्यानंतर त्यांची मुलगी चारुसोबत राहते.
चारू असोपाची मुलगी Ziana ची तब्येत बरी नाही. चारूने तिच्या व्लॉगमध्ये तिच्या मुलीच्या आजाराची माहिती चाहत्यांना दिली आहे. चारूने सांगितले की तिच्या लहान मुलीला हात, पाय आणि तोंडाचा आजाराचा सामना करत आहे. चारूने तिच्या व्लॉगमध्ये सांगितले की Ziana खूप लहान आहे आणि तिला छाले येऊ लागले आहेत. ती झोपू शकत नाही, नीट खाऊ शकत नाही. ती सतत फक्त रडत असते.
चारूने सांगितले की, 'तिने तिच्या मुलीला डॉक्टरांनाही दाखवले आहे आणि तिच्यावर उपचारही सुरु आहेत, पण बराच काळ काहीच काम होत नाही. तिनं सांगितलं की, तिला मध्यरात्री मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागले. मी Ziana सोबत एकटी आहे. त्यामुळे तिला कसे सांभाळायचे ते मला कळत नाही, पण नंतर मला समजले की मी धैर्याने काम करणे आवश्यक आहे, कारण हे माझ्या मुलीबद्दल आहे.'
तिची वेदना व्यक्त करत चारू पुढे म्हणाली, 'मी रात्री 2.30 वाजता जियानाला रुग्णालयात नेले. तिला काय झाले हे डॉक्टरांनाही समजू शकले नाही. पोटदुखीसाठी त्यांनी जियानाला औषध दिलं. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि थोडा वेळ झोपलो, पण जियाना पुन्हा रडू लागली. मग मी चाइल्ड स्पेशालिस्टशी बोलले. त्यांनी सांगितले की जियानाला हात, पाय आणि तोंडाचा आजार आहे.' पण हा कोणता आजार आहे या विषयी चारुनं काही सांगितलं नाही.
चारू म्हणाली की, 'आता तिला माहित आहे की तिच्या मुलीला काय त्रास होत आहे आणि जर तिला योग्य उपचार मिळाले तर जियाना लवकरच निरोगी होईल. नुकत्याच आई झालेल्यांना चारू म्हणाली, मी तुम्हाला विनंती करते की घाबरू नका आणि धीर धरा कारण घाबरल्यामुळे समस्या वाढतात. प्रत्येक स्त्री खूप स्ट्रॉन्ग असते. सर्व नवीन आईंना सलाम. जेव्हा तुम्हाला कठीण आव्हानांचा सामना करावा लागतो, तेव्हाच तुम्हाला तुमची ताकद कळते, तुम्ही किती स्ट्रॉंग आहात हे कळतं.'