मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. त्याचा प्रत्येक सिनेमा हा त्याच्या चाहत्यांसाठी एक ट्रीट असतो. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे जो त्याला सतत फॉलो करताना दिसतो. सलमानच्या प्रोफेशनल लाईफसोबतच त्याचं वैयक्तिक आयुष्य देखील तितकच चर्चेत असतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याच्या लव्ह लाईफबद्दल बरीच चर्चा रंगताना दिसते. सलामनाचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं जातं. त्यात आता वाढदिवसाच्या मुहूर्तावर सलामन खानवरील प्रेम एका अभिनेत्रीने अखेर व्यक्त केलं आहे. 


सलमान खान सुरुवातीला ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सोबत रिलेशनशीपमध्ये होता. पण काही काळानंतर ते कायमचे एकमेकांपासून वेगळं झाले. त्यानंतर सलमान खानचं नाव यूलिया वंतूर, कतरिना कैफसोबत जोडलं गेलं होतं. सध्या यूलिया वंतूर आणि सलमान खान रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. पण त्यातच एका अभिनेत्रीने सलमानसोबतचा बोल्ड फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.



सलमान खानसोबतचा एका सिनेमातील फोटो शेअर करत अभिनेत्री सुष्मिता सेनने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने मेरी जान असं म्हणत सलमानला शुभेच्छा दिल्या आहेत.सलमान खान आणि सुष्मिता सेनचा फोटो व्हायरल होत आहे. सुष्मिता सेन सोशल मीडियावर कमालीची व्हायरल असते. काही दिवसांपूर्वीच सुष्मिताने बॉयफ्रेंडसोबतच्या ब्रेकअपची बातमी शेअर केली होती.


सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने ही माहिती दिली होती. त्यानंतर आता तिने शेअर केला सलमान खानसोबतचा फोटो सगळ्याचं लक्षवेधत आहे.


सुष्मिता आणि सलमान हे खूप जुने मित्र आहेत. दोघेही एकमेकांच्या प्रोजेक्टचे प्रमोशन देखील करताना दिसतात. सुष्मिताने सलमानसोबत चित्रपटात काम केलं आहे. नुकताच सुष्मिता सेनच्या सिनेमाचं पोस्टर सलमान खानने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केलं होतं,