फोटो शेअर करत सुष्मिताने केला आपल्या रिलेशनशीपचा खुलासा...
बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन दिवा सुष्मिता सेन आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि फॅशन दिवा सुष्मिता सेन आपल्या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. सोशल मीडियावर अॅक्टीव्ह असलेली सुष्मिता त्याच माध्यमातून आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहते.
रिलेशनशीप स्टेट्सचा खुलासा
४२ वर्षांच्या सुष्मिताचे अनेक बिजनेसमॅनसोबत नाव जोडले गेले. पण ती अजूनही सिंगलच आहे. पण अलीकडेच या ब्युटी क्वीनने एक फोटो शेअर करत आपल्या रिलेशनशीप स्टेट्सचा खुलासा केला. तो फोटो शेअर करताना तिने लिहिले की, मी कुठे हरवलेली नाही किंवा काही शोधतही नाही... मी माझे आयुष्य जगण्यात खूप व्यस्त आहे. मी पूर्ण आहे... त्यामुळे मला कोणत्याही हॉफची गरज नाही...
आयुष्यावर स्वतःची सत्ता
तिने शेअर केलेला हा फोटो तिच्या सक्षमतेचे प्रतिक आहे. त्याचबरोबर यातूनच ती तिच्या आयुष्यात खूश असल्याचेही दिसते. सुष्मिताने २५ वर्षांची असताना आपली पहिली मुलगी रिनीला दत्तक घेतले. नंतर तिने अजून एका मुलीचे पालकत्व स्विकारले. आपल्या दोन्ही मुलींचे फोटोज, व्हिडिओज ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
बॉलिवूडमधून ब्रेक
१९ वर्षांची असताना सुष्मिताने मिस युनिव्हर्सचा किताब पटाकावला होता. बॉलिवूडमधून ब्रेक घेतलेली सुष्मिता अनेक सोशल इव्हेंट्समध्ये दिसते.