मुंबई : सीरियल 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री चारु असोपा सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. चारुनं राजीव सेनपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हापासून हे जोडपं एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आता चारुनं तिचा एक डान्स व्हिडिओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये डान्स आणि हसताना पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चारुनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत चारूनं निळ्या रंगाचा सलवार-सूट परिधान केला आहे. तर चारुनं पियू बोले या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत चारुनं कॅप्शनमध्ये ब्लू हार्ट दिलं आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


तिचा या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून हा व्हिडीओ 1 लाख पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. तर 7 हजार पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. या व्हिडीओमुळे चारु ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. एक नेटकरी तिला ट्रोल करत म्हणाला, "जर तू इतकी स्वाभिमानी आहेस तर आडनावातलं सेन काढून टाक." दुसरा नेटकरी म्हणाला, "तुझ्या व्हिडीओमध्ये मी राजीव सेनला मीस करते." तिसरा नेटकरी म्हणाला, "तू खरंच घटस्फोट घेत आहेस की हा दिखावा आहे." चारुला ट्रोल करत नेटकऱ्यांनी अशा अनेक कमेंट केल्या आहेत. 
 
चारु-राजीवला सात महिन्यांची झियाना नावाची गोंडस मुलगी देखील आहे. मुलीच्या जन्मानंतर देखील या दोघांमध्ये वाद हे सुरुच राहिले. इन्स्टाग्रमावर चारु आपल्या पतीला फॉलो देखील करत नाही. इतकंच नव्हे तर तिने राजीवबरोबरचे फोटो देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन डिलीट केले आहेत. याबाबत सध्यातरी राजीव-चारुने मौन पाळणंच पसंत केलं आहे.