मुंबई : सिनेस्टार नेहमीच स्वतःचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना देत असतात. प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेनसुद्धा सोशल मीडियावर  अपडेट राहून दैनंदिन जीवनातील घडामोडी तिच्या चाहत्यांना कळवत असते. सुष्मिता सेन तितक्याच उत्साहाने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडींची माहिती सोशल मीडियावर अपडेट करत असते. सुष्मिता सेन आणि तिचा बॉयफ्रेंड रॉमन यांच्यातील नाते सध्या तिच्या चाहत्यांसाठी महत्वाचा विषय ठरला आहे.


रॉमनच्या शुभेच्छा



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुष्मिताने तिचा एक फोटो सोशल मीडियावर अपडेट केला आहे. त्यामध्ये तिने बिबट्याची प्रिंट असलेला जॅकेट घातला आहे. त्यामध्ये सुष्मिता अतिशय सुंदर दिसते. तिच्या या  फोटोवर तिचा बॉयफ्रेंड रॉमान याने कमेंट केली आहे. can't stop falling in love with you सुष्मिताने सुद्धा या कमेंटला रिप्लाय दिला आहे.




04 जानेनारीला रॉमनचा वाढदिवस झाला तेव्हा सुष्मिताने त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.त्यामध्ये तिने रॉमनचा उल्लेख   'रूह' असाही केला होता.   रुह म्हणजेच आत्मा .रॉमन हा आपला आत्मा असल्याचे सांगत रॉमनला वाढदिवसाच्या शुभेच्छा  दिल्या.


लवकरच नव्या भूमिकेत


सुष्मिताच्या दोन्ही मुली आणि रॉमान यांच्यातही चांगले नाते तयार झाले आहे. या चौघांचे नाते त्यांच्या चाहत्यांसाठी चर्चेचा विषय आहे. सुष्मिता आता चंदेरी दुनियेमध्ये पुन्हा पुनरागमन कधी करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सुष्मिता लवकरच एका नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. मध्य प्रदेशमधील एका गुन्हेगारीवर आधारित हे नाटक आहे. ज्यामध्ये सुष्मिता एक कठोर पोलिसाची भूमिका साकारणार आहे.