एकमेकांच्या BF, GF वर कमेंट करायला लागले हृतिक-सुझैन! यूजर म्हणाले- `वाह भाभीजी वाह!`
Sussanne Khan comments on Hrithik Roshan and Saba Azad`s Photo : सुझैन खाननं हृतिक आणि सबाच्या फोटोवर कमेंट केल्यानं नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Sussanne Khan comments on Hrithik Roshan and Saba Azad's Photo : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असतो. सध्या त्याचं चर्चेत येण्याचं कारण हे त्याची पूर्वाश्रमीची पत्नी म्हणजेच एक्स वाईफ सुजैन खान आणि गर्लफ्रेंड सबा आझाद आहे. काही दिवसांपूर्वी सुजैनच्या वाढदिवसानिमित्तानं तिचा बॉयफ्रेंड अर्सलान गोनीनं एक खास पोस्ट शेअर केली होती. या पोस्टवर फक्त त्यांच्या चाहत्यांनी नाही तर हृतिकनं देखील कमेंट केली होती. त्यानं केलेली कमेंट चर्चेचा विषय ठरली होती. आता हृतिकनं त्याची गर्लफ्रेंड सबाच्या वाढदिवसानिमित्तानं पोस्ट शेअर केली असता त्यावर सुजैननं कमेंट केली आहे. तिची ही कमेंट चर्चेचा विषय ठरली आहे.
हृतिकनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये हृतिकनं सबासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत हृतिक म्हणाला, 'आपण सगळेच अशा एका जागेच्या शोधात असतो, जिथे तुम्हाला सुरक्षित आणि छान वाटेल. ज्याच्यासोबत आपण आयुष्यात प्रत्येक अॅडव्हेंचर एन्जॉय करु शकतो आणि हेच मला तुझ्यासोबत नेहमी वाटतं. तुझ्यासोबत मी एक सेफ ठिकाणी म्हणजेच घरी असल्याची भावना येते. इथूनच आपल्या अॅडव्हेंचरची सुरुवात होते. कोणतीही मनोरंजक गोष्ट नसताना त्यातही काही तरी सुंदर असं शोधायचं आणि स्वत: चं मॅजिक शोधायचं. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल तुझे खूप आभार! माय लव्ह तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!' तर हृतिकच्या या पोस्टवर कमेंट करत सबा म्हणाली, 'रो माझ्या संपूर्ण हृदयात तू आहेस, माझ्यासोबत असण्यासाठी आभार.'
हेही वाचा : VIDEO : रोज आपका निकलता है, आज मेरा...; भर रस्त्यात जान्हवीनं असं म्हटलं आणि वळल्या नजरा
हृतिकनं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यावर सुझैननं देखील कमेंट केली आहे. सुझैन कमेंट करत म्हणाली 'किती गोड...खूप प्रेम.' सुझैनची ही कमेंट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. फक्त सुझैन नाही तर तिच्यासोबत अभिनेत्री प्रिती झिंटानं देखील कमेंट केली आहे. प्रिती झिंटानं कमेंट करत लिहिलं की' सबा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. खूप खूप प्रेम आणि अशीच आनंदी रहा.' झोया अख्तर, दिया मिर्झा यांनी देखील सबाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, सगळ्यांचे लक्ष हे हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी केलेल्या कमेंटनं वेधले आहे. 'सबा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा, नेहमी आनंदी रहा', अस ते कमेंट करत म्हणाले.