मुंबई : घटस्फोटानंतर अभिनेता हृतिक रोशन अभिनेत्री सबा आजादला डेट करत असल्याची चर्चा रंगत आहे. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र स्पॉट देखील  करण्यात आलं.  तर दुसरीकडे हृतिकची पहिली पत्नी सुझान खान अभिनता  अर्सलान गोलीला डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. एवढंच नाही तर, मध्यंतरी सबा आणि हृतिक लवकरचं लग्न करणार असल्याचं समोर आले. याच दरम्यान सुझान आणि बॉयफ्रेंड अर्सनालचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खुद्द सुझानने बॉयफ्रेंडसोबतच्या खासगी क्षणांच्या फोटोंचा एक कोलाज तयार करून इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. बॉयफ्रेंडवर असलेलं प्रेम व्यक्त करत सुझानने कॅप्शनमध्ये, 'मला माहित नाही तुला काय सांगितलं... पण वेळ निघून जात आहे, म्हणून प्रत्येक क्षण सोन्यासारखा जगा...' असं लिहिलं आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या सुझान आणि अर्सलानचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. महत्त्वाचं म्हणजे, दोघांनी अद्याप त्यांच्या नात्याचा स्वीकार सर्वांसमोर केलेला नाही. आम्ही दोघे एकमेकांचे चांगले मित्र आहोत असं... एका मुलाखतीत सुझानने सांगितलं. 


अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान जेव्हा विभक्त झाले, तेव्हा त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. आज सुझान आणि हृतिक वेगळे राहत असले तरी ते दोघे मुलांचं योग्य पद्धतीने सांभाळ करतात. सुझान आणि हृतिक मुलांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात जातात. 


पण जवळपास 17 वर्षांचं नातं संपवत दोघांनी घटस्फोट घेण्याचा टोकाचा निर्णय घेतला. हृतिकनंतर सुझान खानच्या आयुष्यात खास व्यक्तीची एन्ट्री झाली आहे. सुझानच्या मनावर राज्य करणाऱ्या त्या व्यक्तीचं नाव अर्सलान गोनी (Arslan Goni) आहे.