`मतदान यादीत माझ्याजागी वेगळंच नाव आढळलं...`, अभिनेत्याचा सुयश टिळकचा संताप
Suyash Tilak Could Not Vote : सुयश टिळकं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मतदान करु शकला नाही यावरुन संताप व्यक्त केला आहे.
Suyash Tilak Could Not Vote : सध्या अनेक लोक हे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठीचं मतदान करताना दिसत आहेत. त्यामुळेच मतदान केंद्रावर चांगलीच गर्दी झाली. यावेळी फक्त सर्वसामान्य लोकं नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांच्या त्यांच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करत आहेत. सुयश टिळकला यावेळी मतदान करायला मिळालं नाही. त्यासंबंधीत त्यानं एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे.
सुयशनं ही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून केली आहे. ही पोस्टमध्ये सुयष म्हणाला की "गेल्यावेळी मतदान केले तेव्हा नावात चूक असलेली सुधारायचा अर्ज दिला होता. यावेळी सुदैवानं ऑनलाईन पोर्टलवर खूप शोधून शेवटी नाव सापडले असताना (त्यात तीच चूक होतीच.) वोटींग बूथला सकाळी 7 वाजता पोहोचलो. माझ्या ऑनलाईन पोर्टल वरच्या यादीच्या नोंदीत असलेल्या जागी बूथ वर असलेल्या यादीत मात्र, वेगळेच नाव आढळले म्हणून 3 तास वेगवेगळ्या बूथ वर जाऊन नाव शोधायचा प्रयत्न केला. अचानक यावेळी काही जणांचा मतदार संघच बदलला आहे, ते कळले म्हणून वेगळ्या मतदार संघात पण चौकशी केली शोधाशोध केली. गेली अनेक वर्ष मी मतदान न चुकता करत आलो आहे, यावेळी मला तो हक्क बजावता आला नाही. कोणत्याही इतर पर्यायाने देखील मतदान करू दिले नाही याची खंत वाटते वाटत राहील."
हे सगळं शेअर करत सुयशं कॅप्शन दिलं की दुर्दैवाने, "मला मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला. कारण यावर्षी माझं नाव गूढपणे यादीतून गायब झाले."
हेही वाचा : 'मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांनी मला मतदान न करु देताच...' गायिका सावनी रविंद्रने व्यक्त केली नाराजी
दरम्यान, फक्त सुयश नाही तर त्यासोबतच गायिका सावनी रविंद्रनं देखील मतदान करता आलं नाही यामुळे संताप व्यक्त केला आहे. ती पोस्ट शेअर करत सावनी म्हणाली की "गेले अनेक दिवस सर्व ऑनलाइन पोर्टल वर मतदारांच्या यादीत नाव शोधण्याचा प्रयत्न करूनही नाव सापडले नाही. शेवटी आज मतदान केंद्राला जाऊन नाव शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही नाव सापडले नाही. ( ज्या ठिकाणी मी गेली अनेक वर्षे मतदान करत आहे त्याच ठिकाणी) आमच्या घरातील बाकी सर्व सदस्यांची नावं आहेत पण माझे नाही. या बद्दल स्वतः वोटिंग ऑफिसरची त्या ठिकाणी जाऊन भेट घेऊन AED पर्यायाने वोट करू शकते का याबद्दल विचारणा केली, त्यांनी नकार दिल्याने मत न देताच परत यावे लागले. अत्यंत खेदजनक"